नागपंचमी-शुभेच्छा-8

Started by Atul Kaviraje, August 21, 2023, 04:57:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "नागपंचमी"
                                      ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०८.२०२३-सोमवार आहे. आज "नागपंचमी" आहे. श्रावण महिन्यात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. यासोबतच काल सर्प दोषाने पीडित लोकही पूजा करून दोष दूर करतात. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना नागपंचमी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया नागपचंमी शुभेच्छा. 

भगवान शंकराच्या गळ्यात सापाचा हार आहे...
नागपंचमी शिवभक्तांसाठी खास उत्सव आहे.
नागपंचमीच्या शुभेच्छा

नागपंममीचा सण आला, पर्जन्यराजाला  आनंद झाला
न्हाहून निघाली वसुधंरा, घेतला हाती हिरवा शेला...
नागपंचमीच्या शुभेच्छा

भगवान शंकराची कृपा झाली, सखेसवे मी नागपूजनाला निघाली...
नागपंचमीच्या शुभेच्छा

नागपंचमीचा  दिवस तुमच्या आयुष्यात यश आणि आरोग्य प्राप्त करो...
आजचा दिवस शिवाला अर्पण करा... नागपंचमीच्या शुभेच्छा

शेतकऱ्याचा मित्र नागदेवताची पूजा करण्याचा आज दिवस...
नागपंचमीच्या सर्वांना मनोभावे शुभेच्छा

पवित्र महिन्यातील पहिला सण नागपंचमी...
नागदेवतेची कृपा तुमच्यावर सदैव राहो...
नागपंचमीच्या शुभेच्छा

दूध लाह्या वाहू नागोबाला,
चल गं सखे जाऊ वारूळाला...
नागपंचमीच्या भक्तिमय शुभेच्छा

नागोबाचे रक्षण करू. हीच खरी नागपंचमी...
श्रावणातील या पहिल्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा

सण आला नागपंचमीचा, मनापासून शुभेच्छा तुम्हाला
सदैव सुखी, आनंदी राहा, हिच आमची सदिच्छा
नागपंचमीच्या भक्तिमय शुभेच्छा

पावसाच्या लपंडाव खेळण्याऱ्या सरी,
सोन पिवळ्या उन्हाच्या मधूनच लकाकणाऱ्या लडी आणि हिरवे गालिचे लपेटलेली धरती,
अशा वातावरणाची परसात घेऊन
आला आला श्रावण महिना
या महिन्याच्या पहिल्याच पंचमीला पूजू या नागदेवतेला
नागपंचमीच्या शुभेच्छा...

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.वेब दुनिया.कॉम)
                    -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2023-सोमवार.
=========================================