प्रेमिकांची विरह कविता-हा एकाकीपणा, ही रुक्ष तनहाई, नशिबी न येवो पुन्हा ही जुदाई

Started by Atul Kaviraje, August 28, 2023, 10:49:58 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, प्रेमी प्रेमिकांची विरह कविता-गीत ऐकवितो. "मार गई मुझे तेरी जुदाई, डस गई ये तन्हाई"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही पाऊस थांबलेली, पूर्वेस चक्क चमकदार ऊन पडलेली आणि पच्छिमेस क्षितिजावर काळे ढग अवतरलेली सोमवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( मार गई मुझे तेरी जुदाई, डस गई ये तन्हाई )           
-------------------------------------------------------

            "हा एकाकीपणा, ही रुक्ष तनहाई, नशिबी न येवो पुन्हा ही जुदाई"
           --------------------------------------------------------

हा एकाकीपणा, ही रुक्ष तनहाई
नशिबी न येवो पुन्हा ही जुदाई
हा एकाकीपणा जणू शिक्षाच देतोय,
तुझ्या माझ्या विरहाची परीक्षाच पाहतोय

हा एकाकीपणा, ही रुक्ष तनहाई
नशिबी न येवो पुन्हा ही जुदाई
हा एकाकीपणा जणू खायलाच उठतोय,
माझा आवाज आतल्या आत दबला जातोय

तुझी आठवण येतेय, पण ती परतुनी जातेय
तुझ्या चेहरा दिसतोय, पण फक्त आभास होतोय
झोप माझी आज वैरीणच झाली आहे,
बिछायत सजवलेली तशीच पडली आहे

आपले प्रेम आपली परीक्षा तर पाहत नाही ना ?
ते आपल्याला या विरहाची शिक्षा तर देत नाही ना ?
आता सोसवत नाही ही जुदाई, ही जाचणारी तनहाई,
उत्साहाने सळसळतं मन कसं उदासीने भरून येई

कित्येक रात्री मी अश्याच जागून काढल्यात
कित्येक दिवस मी तुझ्या आठवणीवरच जगून काढलेत
झोपच नाही, मग स्वप्ने तरी कुठून पडणार ?,
स्वप्नेच पडत नाही, तर तू माझ्या स्वप्नात कोठून येणार ?

खूप सोसलंय मनाने, खूप अनुभवलंय या जुदाईत 
दुःखाचा अतिरेक होत होता, या कोसत राहणाऱ्या तनहाईत 
मन मारून जगायचं, मुद्दाम का चूप रहायचं ?,
मनाला काही भावना नाहीत, मूग गिळून गप्प बसायचं ?

आता नाही सहन होत, मन बंडच करून उठलय
झालं ते खूप झालं, या विरहात सIर काही खाक झालय
तू मला पुन्हा मिळावIस, तुझं प्रेम मला पुन्हा मिळावं,
जमाना काहीही का बोलेना, तुझं माझं नातं पुन्हा जुळावं

आज मी हा लज्जेचा घुंघट दूर केलाय
शरमेच पांघरूण कसोशीने लांब सIरलय
हयI, लाज, अदब या शब्दांना शब्दकोशातून वगळलंय,
मी माझ्या साजणाची राधिका आहे, प्रियकराची प्रेमिका आहे

आता मी गप्प नाही बसणार, चूप नाही राहणार
मी माझा हक्क मिळवणार, सारी बंधने तोडून टाकणार
आता आणि विरह नाही सहणार, माझे प्रेम मी मिळवणार,
रुसवाई, तनहाई, जुदाई, यांना मी धैर्याने तोंड देणार

लोक काहीही म्हणोत, लोक नावेही ठेवोत
आमच्या प्रेमात ते अडथळा का बरं आणताहेत ?
त्यांना काय आनंद मिळतोय आमची ताटातूट पाहून ?,
त्यांच्या प्रश्नांना मी आज मुहतोड जबाब देणार

आता आम्हा दोघा कोणीही विभक्त करणार नाही
आमचे प्रेम एक आहे, ते कोणीही वेगळे करणार नाही
आता हि जुदाई, तनहाई कधीही नशिबी येणार नाही,
आता यापुढे प्रेम आमची ताटातूट कधीच करणार नाही

ठरवलंय, आजच मी तुझी होईन प्रियकरा
आणि तू माझा होऊन जा, जिवलगI 
ही जुदाई, ही तनहाई एकमेकांची आपणच दूर करूया,
खूप भोगलंय विरहात, आता अधिक दुःख नको सोसूया

ईश्वराने बांधल्यात लग्न-गाठी स्वर्गात साऱ्यांच्या
त्यालाच साक्षी ठेवून आपण विवाह बंधनात बंधूया
कुणी मित्र नको, जवळचे आप्त नको, आणि वरातही नको,
शहनाईचे मंजुळ सूर नको, की लग्नाची डोलीही नको

एकमेकांच्या जवळ येऊया, प्रेम-रज्जूत बद्ध होऊया
हातात हात घेऊन, परस्परांना मनाने वरूया
आपले स्वप्न आज पूर्ण होतंय, माझ्या राजा, माझ्या साजणा,
आपणच आपले नशीब पूर्णपणे बदलून टाकूया

हे सर्व आधीच व्हायला हवं होत,
हे सIर यापूर्वीच घडायला हवं होत
चुका खूप झाल्यात आपल्याच हातून,
वेळेवरच सIर काही निस्तरायला हवं होत 

सारे प्रश्न कसे चुटकीसरशी सुटले असते
या तनहाईचे, या जुदाईचे दिवस कधीच आले नसते
ती वेळच तेव्हा तशी होती, सIर उशिराच घडत होते,
तुझे माझे घनिष्ट नाते तेव्हाच होकारात बदलले असते

ही जुदाई, ही तनहाई, ही रुसवाई नावालाही अIली नसती
विरहाच्या अग्नीत अशी मनाची तगमग झाली नसती
हा विरह असह्य होता, चुकीचे प्रायश्चितच  देत होता,
ही ताटातूट अघोरी होती, दोघांनाही क्रूरपणे छळत होती

पण आता ते दिवस गेलेत, मागे राहिलेत
तनहाईचे, जुदाईचे दिवस निघून गेलेत
तो विरह, ती ताटातूट, ती फारकत शिल्लक नाही नावालाही,
तो एकाकीपणा, ते एकलेपणाचे दुःख, आता उरलंच नाही 

आता साजणा फक्त तू आणि मीच आहे
आता फक्त प्रेम आणि फक्त प्रेमचं आहे
ते नकोसे दिवस सरलेत, आनंदाचे क्षण आलेत,
आता सIर सIर काही कुशल आणि क्षेमच आहे

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.08.2023-सोमवार.
=========================================