नारळी पौर्णिमा-माहिती-1

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 02:37:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "नारळी पौर्णिमा"
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "नारळी पौर्णिमा" आहे. नारळी पौर्णिमा हा हिंदू सण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोळी समुदायाद्वारे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरमधील श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो आणि म्हणूनच याला श्रावण पौर्णिमा देखील म्हणतात. यावर्षी नारळी पौर्णिमा 30 ऑगस्ट 2023 रोजी येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना नारळी पौर्णिमा सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, नारळी पौर्णिमा सणाची माहिती.

     नारळी पौर्णिमा हा सण समुद्रकाठी राहणाऱ्या व प्रामुख्याने मासेमारी करणाऱ्या मुख्‍य कोळी लोकांचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी लोक या दिवशी समुद्राची पूजा करतात.

     समुद्राला नारळ अर्पण करतात. महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा अखंड समुद्रकिनारा लाभलेला आहे. या ठिकाणी राहणाऱ्या कोळी लोकांचे उपजीविकेचे प्रमुख साधन किंवा व्यवसाय हा मासेमारी आहे. ते लोक श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हणतात.

     नारळी पौर्णिमेच्या काही दिवस अगोदर कोळी बांधवांनी समुद्रात जाणे बंद केलेले असते. कारण एक तर तो काळ समुद्रातील माशांचा प्रजननाचा काळ असतो किंवा मग पावसाळ्यामध्ये समुद्र खवळलेला असल्याने समुद्रात मासेमारीसाठी कोळीबांधव जात नसतात. कोळी बांधव त्यांच्या त्या सुट्टीच्या काळात बरेच आपापल्या मूळ गावी गेलेले दिसतात.

     बोटीवरचे खलाशी देखील आपल्या गावी जातात. बरेच कोळी बांधव यादरम्यान देवदर्शन करण्यासाठी गेलेले आपल्याला देखील दिसतात. मात्र नारळी पौर्णिमेचा सण जसा जवळ येउ लागतो, तसे कोळीबांधवांना मासे पकडण्याचे वेध लागते आणि सगळेजण मुंबईला आपल्या कोळीवाड्या मध्ये परततात.

     नारळी पौर्णिमेचा सण कोळी बांधव अत्यंत पारंपारिक पद्धतीने साजरा करतात. कोळी बांधव आपल्या पारंपारिक वेश त्या दिवशी परिधान करतात. कमरेला रुमाल अंगात टीशर्ट आणि डोक्याला टोपी. तर स्त्रिया जरीचे कपडे परिधान करून अक्षरश: सोन्याचे पूर्ण दागिने अंगावर परिधान करतात.

     कोळी स्त्रिया कायमचेच सोन्याचे भरपूर दागिने अंगाभर घालत असतात. त्यामुळे सामान्य लोकांना त्यांचे खूप आश्चर्य वाटते. सगळेच कोळी बांधव सायंकाळ -च्या वेळेला समुद्राची पूजा करायला निघतात. दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करतात. सोन्याचा नारळ म्हणजे त्या नारळाला सोनेरी कागदाचे वेस्टन गुंडाळल्या जाते आणि तो नारळ सागराला अर्पण केला जातो व समुद्राला गोड नैवेद्य दाखवून गाऱ्हाणं घातला जातो.

                नारळी पौर्णिमेचे महत्व:--

     पावसाळ्यात समुद्रामध्ये मासेमारीसाठी उतरणारे कोळी लोकांना समुद्रापासून धोका असतो. त्यामुळे श्रावणी पौर्णिमेनंतर पावसाचा जोर थोडा कमी झालेला असतो. समुद्र हे वरून देवतेच्या वास्तव्याचे ठिकाण मानले जाते. समुद्राची कृपा कोळी लोकांवर रहावी. म्हणून रीतसर पूजा करून वाजत-गाजत सोन्याचा नारळ अर्पण करतात.

     या दिवशी नारळाच्या पदार्थाला महत्त्व असते. देवाला नारळ भाताचा आणि ओल्या नारळाची करंजीचा नैवेद्य अर्पण करतात. नारळी पौर्णिमेला अर्पण करावयाचे. नारळ हे फळ शुभसूचक मानले जाते तसेच ते सर्जन शक्तीचे प्रतीक मानले आहे. यामुळे समुद्राला नारळ अर्पण करताना तो पाण्यात फेकू नका तर हळूवारपणे सोडा. नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवतेला आवाहन करून सागराला नारळ अर्पण करतात. त्यामुळे सागरातील येणारे संकट पळून जाईल असा त्यामागचा उद्देश आहे.

--प्रमोद तपासे
-------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी मोल.कॉम)
                       ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================