नारळी पौर्णिमा-माहिती-2

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 02:39:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                     "नारळी पौर्णिमा"
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "नारळी पौर्णिमा" आहे. नारळी पौर्णिमा हा हिंदू सण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोळी समुदायाद्वारे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरमधील श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो आणि म्हणूनच याला श्रावण पौर्णिमा देखील म्हणतात. यावर्षी नारळी पौर्णिमा 30 ऑगस्ट 2023 रोजी येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना नारळी पौर्णिमा सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, नारळी पौर्णिमा सणाची माहिती.

             नारळी पौर्णिमा कशी साजरी करतात:--

     नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपत्तीजनक यमलहरींचे आधिक्‍य असते. या लहरी ब्रह्मांडात भोवऱ्याप्रमाणे वेगात असतात. वरुण देवता ही जलावर ताबा मिळवणारी व त्याचे संयमन करणारी असल्याने या दिवशी सागररूपी वरुणदेवतेला आवाहन करून नारळ अर्पण करून ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या यमलहरींना ताब्यात ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते. नारळातील पाण्यात तेजतत्त्वाचे प्रमाण अधिक असते. नारळातील पाणी हे अपंगत्वाचे प्रमाण जास्त असणार्‍या यमलहरी ग्रहण करण्यात अतिशय संवेदनशील असते.

     वरुणदेवतेला आवाहन करतांना तिच्या कृपा आशीर्वादाने यमलहरी नारळाच्या पाण्याकडे आकृष्ट होतात. नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व या यमलहरींना ताब्यात ठेवून त्यांतील रज-तम कणांचे विघटन करून त्यांना सागरात विलीन करते. म्हणून या दिवशी वायुमंडलातील यमलहरीचे नारळाच्या माध्यमातून उच्चाटन करून सागररूपी वरुण देवतेला चरणी त्यांचे समर्पण करण्याला महत्त्व आहे. यामुळे वायुमंडळाची शुद्धी होते.

     कोळी लोकांचा नारळी पौर्णिमा हा महत्त्वाचा सण असल्यामुळे नारळी पौर्णिमा कोळी वाड्यांमध्ये आजही धुमधडाक्यात साजरी केली जाते. होड्या रंगरंगोटी करून सजवण्यात येतात. दर्या म्हणजेच सागराला आपला मान देण्यासाठी कोळी महिला नैवेद्याच्या तयारीला लागलेले असतात. सोन्याचा नारळ अर्पण करून खवळलेल्या दर्याराजाला शांत करून त्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त त्या दिवशी केली जाते. तसेच काही ठिकाणी भव्यदिव्य मिरवणुका देखील काढले जातात.

     मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील ऐरोली, बोनकोडे, विसावा, माहीम, सातपाटी चारकोप, मालवणी, वाशी, सारसोळे इत्यादी ठिकाणी नारळी पौर्णिमेच्या तयारीची लगबग पाहायला मिळते. कोळी महिलांसह लहान मुले सुद्धा घरात सजावट करताना दिसतात तसेच कोळी लोक किनारी नांगरून ठेवलेल्या होड्यांना रंग देतात. समुद्राला नैवेद्यासाठी कोळी महिला ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भात, नारळी पाक तयार करण्यात गुंतलेल्या असतात. एकूण कोळी वाड्यातील उत्साह शिगेला पोहोचल्याचे चित्र त्या दिवशी पाहायला मिळते. अशा प्रकारे नारळी पौर्णिमा साजरी केली जाते.

     नारळीपौर्णिमा ही शास्त्राप्रमाणे श्रावण पौर्णिमेस सागराची पूजा करून, त्याला श्रीफळ अर्पण करतात. म्हणून या दिवसाला नारळी पौर्णिमा असे म्हटले जाते. श्रीफळ सागराला अर्पण करायचे असले तरी हेतू संपूर्ण जलदेवतेची पूजा हाच आहे. कोळी समाजाचा आणि सागराचा संबध अतूट असल्याने ते नारळी पौर्णिमा वाजतगाजत थाटामाटात आणि अतिशय जल्लोषात साजरी करतात. पालखी सजवून तिच्या सोन्याचा नारळ ठेवून नाचतात व त्याची आनंद आणि मिरवणूक काढतात.

     हिंदू धर्मात पूजाविधीत नारळाला फार महत्व आहे. नारळाला श्रीफळ असेही म्हणतात श्री म्हणजे लक्ष्मी आणि फळ म्हणजे नारळ नारळाच्या बहुविध गुणांमुळेच नारळाला पवित्र फळ म्हणून मान्यता मिळाली आहे. नारळात अनेक औषधी गुण देखील आहेत. शरीराचा दाह, उष्णता कमी करण्यासाठी ओले खोबरे खावे. रक्त पडल्यास साखर खोबरे खावे रक्त पडावयाचे थांबते. खोकल्यातून रक्त आल्यास मनुक्या बरोबर खोबरे खावे. ओले खोबरे खाल्ल्यास जास्त तहान लागत नाही.

     नारळाचे दूध बळ वाढविते, पाणी लघवी साफ करते, तूप अर्धा अंगावर उपयोगी आहे. केस गळत नाहीत तसेच उचकी थांबते. नारळाची वाटी किंवा जाळून देखील ठेवल्यास त्याचे जे तेल येते त्याने खरूज नाईट यासारखे त्वचारोग बरे होतात. नारळाच्या झाडाच्या फांद्या व खोडापासून अनेक उपयोगी वस्तू तयार होतात. म्हणून माडाला कल्पवृक्ष असेही म्हटले जाते.

     अशा प्रकारे नारळाची पूजा म्हणजेच निसर्गाची पूजा अर्थात वृक्षवल्ली, आम्हा सोयरे ! जलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नारळी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो.

--प्रमोद तपासे
-------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी मोल.कॉम)
                      -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================