नारळी पौर्णिमा-कविता-1-नारळी पौर्णिमा

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 02:43:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "नारळी पौर्णिमा"
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "नारळी पौर्णिमा" आहे. नारळी पौर्णिमा हा हिंदू सण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोळी समुदायाद्वारे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरमधील श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो आणि म्हणूनच याला श्रावण पौर्णिमा देखील म्हणतात. यावर्षी नारळी पौर्णिमा 30 ऑगस्ट 2023 रोजी येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना नारळी पौर्णिमा सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, नारळी पौर्णिमेवर एक कविता.

                                   "नारळी पौर्णिमा"
                                  ----------------

सण हा नारळी पौर्णिमेचा

सागरपुत्रांच्या आनंदाचा


दर्या राजा असे देव त्यांचा

रक्षणकर्ता तो सकलांचा


सारे त्याला श्रीफळ वाहती

मनोभावाने पूजन करती


सागरा, हो आम्हावर प्रसन्न

आम्हा सर्वांचे करी रक्षण


बहीण सासरहून माहेराला

येते भावा राखी बांधायला


धागा पवित्र असे रेशमाचा

भाऊ बहिणीच्या बंधनाचा


बांधून ती राखीचा प्रेमधागा

आपल्या भावा करते जागा


भाऊ समजून घे रक्षाबंधन

वृत्ती, दृष्टीचे कर तू रक्षण


मान साऱ्या स्त्रिया बहिणी

पूज्य भाव ठेवावा तू मनी


भाऊ बहिणीच्या आनंदाचा

सण हा नारळी पौर्णिमेचा

--पंडित वराडे
-------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                        -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================