तूच गवळी असशी माझा

Started by marathi, January 24, 2009, 11:12:13 AM

Previous topic - Next topic

marathi


स्वप्नांत गुरफटलेले असताना
झोपमोड माझी करताना
तूच गवळी असशी माझा
पहाटे दार ठोठावताना ॥ १ ॥

भाव दुधाचा चढवताना
'पातळी' दुधाची वाढवताना
तूच गवळी असशी माझा
'पाण्यात दूध' मिसळताना ॥ २ ॥

अडचणीची वेळ असताना
नेमकी दडी मारताना
तूच गवळी असशी माझा
गरज संपताच, येताना ॥ ३ ॥

वेळ रोजची चुकवताना
परी महिना संपताना
तूच गवळी असशी माझा
नेमका वेळेवर येताना ॥ ४ ॥

शशांक