नारळी पौर्णिमा-हार्दिक शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 02:51:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                   "नारळी पौर्णिमा"
                                  ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "नारळी पौर्णिमा" आहे. नारळी पौर्णिमा हा हिंदू सण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोळी समुदायाद्वारे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरमधील श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो आणि म्हणूनच याला श्रावण पौर्णिमा देखील म्हणतात. यावर्षी नारळी पौर्णिमा 30 ऑगस्ट 2023 रोजी येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना नारळी पौर्णिमा सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     नमस्कार मित्रांनो आज आपल्या कोळी बांधवांचा महत्वाचा सण नारळी पौर्णिमा आहे. ही नारळी पौर्णिमा श्रावण महिन्याला येत असते म्हणून या पौर्णिमेला श्रावण पौर्णिमा म्हणतात. या दिवशी समस्त कोळी बांधव समुद्रदेवतेला शांत करण्यासाठी त्याची पूजा करतात नंतर ते समुद्राची सैर करून झाल्यावर समुद्रकिनारी येतात व संपूर्ण दिवस आनंदाने नाचून गाऊन साजरा करतात. या दिवसापासून मासेमारी करणारे लोक आपल्या व्यवसायाला सुरवात करीत असतात म्हणून हा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असतो.

     श्रावण पौर्णिमेला ही लोक सागराला नारळ अर्पण करीत असतात म्हणून या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात.

     मित्रांनो, आज आपण या पोस्टमध्ये नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा बघणार आहोत. तुम्ही जर Narali Purnima Quotes, Narali Purnima Wishes, Narali Purnima SMS, Status शोधत असाल तर ते तुम्हाला इथे मिळतील. या पोस्टमध्ये आम्ही नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश,कोट्स, मराठीमध्ये दिलेल्या आहेत.

             नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
सन आयलाय गो, आयलाय गो
नारली पुनवेचा..
मनी आनंद मावना,
कोळ्यांच्या दुनियेचा..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!

नारळी पौर्णिमेनिमित्त
सागराला श्रीफळ अर्पण करताना
सर्व कोळी बांधवांच्या
समृद्ध जीवनाचा संकल्प करूया..
समस्त कोळी बांधवाना
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

नारळी पौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठीमध्ये
नारळी पौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठीमध्ये
मान्सूनचा शेवट आणि मासेमारीच्या नव्या हंगामाची सुरूवात असणार्‍या
नारळी पौर्णिमेचा दिवस तुम्हांला सुख, शांती समृद्धी घेऊन येवो,
श्रावण पौर्णिमेच्या शुभेच्छा

नारळी पौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठीमध्ये
नारळी पौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठीमध्ये
नारळी पौर्णिमा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येवो,
समुद्र देव शुभाशिर्वाद देऊन तुम्हांला सौख्य, मांगल्य देवो
नारळी पूर्णिमा शुभेच्छा!

कोकण म्हणजे लाल मातीतली वाट,
कोकण म्हणजे निसर्गाचा थाट..
कोकण म्हणजे भरलेला पापलेट,
कोकण म्हणजे वडे सागोतीचं ताट..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

कोळीवारा सारा सजलाय गो,
कोळी यो नाखवा आयलाय गो...
मासळीचा दुष्काळ सरू दे,
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे..
सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
=========================================

--सुमेध हरिश्चंद्र
--------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाजत्रा.कॉम)
                        ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================