नारळी पौर्णिमा-हार्दिक शुभेच्छा-2

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 02:53:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                    "नारळी पौर्णिमा"
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "नारळी पौर्णिमा" आहे. नारळी पौर्णिमा हा हिंदू सण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोळी समुदायाद्वारे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरमधील श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो आणि म्हणूनच याला श्रावण पौर्णिमा देखील म्हणतात. यावर्षी नारळी पौर्णिमा 30 ऑगस्ट 2023 रोजी येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना नारळी पौर्णिमा सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

            नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे..
माझ्या कोळीबांधवांना सुखाचे दिस येऊ दे..
नारळी पौर्णिमेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!!

नारळी पौर्णिमा कोट्स इन मराठी
नारळी पौर्णिमा कोट्स इन मराठी
दर्यासागर हाय आमचा राजा
त्याचे जीवावर आम्ही करताव मजा
नारले पुनवेला नारल सोन्याचा
सगले मिलून मान देताव दरियाचा
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

कोळीवारा सारा सजलाय गो..!
कोळी यो नाखवा आयलाय गो !...
"मासळीचा दुष्काळ सरू दे,
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे'
"सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

कोकण म्हणजे लाल मातीतली वाट,
कोकण म्हणजे निसर्गाचा थाट!
कोकण म्हणजे भरलेला पापलेट,
कोकण म्हणजे वडे सागोतीच ताट!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

सण नारली पुनवेचा,
दर्या सारंगा नमन तुजला !
सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

सण आज आला
नारळी पौर्णिमेचा
सागरपुत्रांच्या आनंदाचा
दर्या राजा असे देव त्यांचा
रक्षणकर्ता तो सकलांचा
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा !

कोकण म्हणजे निळी खाडी,
कोकण म्हणजे माडाची झाडी!
कोकण म्हणजे सागराची गाज,
कोकण म्हणजे रूपेरी वाळुचा साज!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

मासेमारी प्रारंभ फ्रॉम नारळी पौर्णिमा
कोळी बांधवांचा सण,
उधाण आनंदाला,
कार्यारंभ करती,
अर्पूण नारळ सागराला...
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

सण जिव्हाळ्याचा दिवस आज
नारळी पौर्णिमेचा
समस्त कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
=========================================

--सुमेध हरिश्चंद्र
--------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाजत्रा.कॉम)
                        ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================