नारळी पौर्णिमा-हार्दिक शुभेच्छा-8

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 03:02:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "नारळी पौर्णिमा"
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "नारळी पौर्णिमा" आहे. नारळी पौर्णिमा हा हिंदू सण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोळी समुदायाद्वारे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरमधील श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो आणि म्हणूनच याला श्रावण पौर्णिमा देखील म्हणतात. यावर्षी नारळी पौर्णिमा 30 ऑगस्ट 2023 रोजी येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना नारळी पौर्णिमा सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     जून ते ऑगस्ट भरपूर पाऊस असल्यामुळे समुद्राला उधाण आलेले असते. तसेच हा माशांच्या प्रजननाचा काळ असल्यामुळे वर्षानुवर्षे समुद्रावर अवलंबून असणारे कोळी बांधव ३ महिने समुद्रावर मासेमारी करणे थांबवतात. आज नारळी पौर्णिमेचा मुहूर्त साधून समुद्राची आणि होडीची पूजा करून मासेमारीला प्रारंभ केला जातो. स्त्रिया विशेषकरून समुद्राला करंजी लाडू आणि पुरणपोळीचा नैवद्य दाखवून त्याची पूजा करतात आणि दूर मासेमारीला समुद्रात जाणाऱ्या आपल्या धन्याचे रक्षण कर अशी समुद्राला विनंती करतात.

         नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
नारळी पौर्णिमेनिमित्त
सागराला श्रीफळ अर्पण करताना
सर्व कोळी बांधवांच्या
समृद्ध जीवनाचा संकल्प करूया..
समस्त कोळी बांधवाना आणि संपूर्ण महाराष्टाला
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

कोकण म्हणजे निळी खाडी,
कोकण म्हणजे माडाची झाडी..
कोकण म्हणजे सागराची गाज,
कोकण म्हणजे रूपेरी वाळुचा साज..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!

दर्यावरी आमचे डोल होरी
घेऊन माशांच्या डोली
नं आम्ही हावं जातीचे कोळी..
सर्व कोळी बांधवांना
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!

ह्या मोसमात पापलेट, सुरमई, रावस, हलवा, घोळ,
मोरी, बांगडा, बोंबिल, मांदेली यांची रेलचेल होऊन
महाराष्ट्रातील सर्व कोळीवाड्यांत भरभराट होवो, या सदिच्छांसह..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!

भावाबहिणीचे आणि कोळी दर्याचे नाते अतूट
सर्व कोळी बांधवाना
नारळीपौर्णिमेच्या..
आणि बंधुभगिनींना
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
=========================================

--गीता देवरे
-----------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदी मराठी sms.कॉम)
                  -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================