नारळी पौर्णिमा-हार्दिक शुभेच्छा-9

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 03:04:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "नारळी पौर्णिमा"
                                  ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "नारळी पौर्णिमा" आहे. नारळी पौर्णिमा हा हिंदू सण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोळी समुदायाद्वारे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरमधील श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो आणि म्हणूनच याला श्रावण पौर्णिमा देखील म्हणतात. यावर्षी नारळी पौर्णिमा 30 ऑगस्ट 2023 रोजी येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना नारळी पौर्णिमा सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     नारळी पौर्णिमेला कोळी बांधव बोटींना रंगरंगोटी करून पताका लावून सजवतात. सोन्याचे वेष्टन असलेला नारळ समुद्राला अर्पण करून व्यवसायात भरभराट होऊ दे अशी समुद्र देवतेला प्रार्थना केली जाते. एकमेकांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या जातात. हा सण कोळी बांधव मोठ्या जल्लोषाने आणि वाजत गाजत साजरा करतात. आम्ही या लेखात नारळी पौर्णिमा सणासाठी काही खास शुभेच्छांचा संग्रह जमा केला आहे, तो तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही ह्या शुभेच्छा इतरांनाही शेअर कराव्या अशी विनंती आहे.

              नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
सण हा
बहीण भावाच्या अतूट प्रेमाचा
हा बंध रेशमी धाग्याचा..
नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा..!!

नारळी पौर्णिमे निमित्त
आपणास व आपल्या कुटुंबीयास
हार्दिक – हार्दिक शुभेच्छा..!!

नारळी पौर्णिमेच्या दिनी समुद्राला येते भरती,
दर्याराजाला शांत हो अशी कोळीबांधव प्रार्थना करती..
आज असतो सगळ्यांकडे नैवेद्याला नारळीभात,
सागराला सोन्याचा नारळ वाहून मासेमारीला होते सुरुवात..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!

दर्यासागर हाय आमचा राजा,
त्याचे जीवावर आम्ही करताव मजा..
नारले पुनवेला नारळ सोनीयाचा,
सगले मीलून मान देताव दरियाचा..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!

कोकण म्हणजे लाल मातीतली वाट,
कोकण म्हणजे निसर्गाचा थाट..
कोकण म्हणजे भरलेला पापलेट,
कोकण म्हणजे वडे सागोतीचं ताट..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!
=========================================

--गीता देवरे
-----------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदी मराठी sms.कॉम)
                   -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================