३०-ऑगस्ट-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 05:14:57 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                "३०-ऑगस्ट-दिनविशेष"
                               ----------------------

-: दिनविशेष :-
३० ऑगस्ट
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९७९
सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटांएवढी ऊर्जा निर्माण करुन 'हॉवर्ड-कुमेन-मायकेल्स' हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठबागावर आदळला. बरेचसे धूमकेतू सूर्याच्या पृष्ठभागावर आदळण्यापूर्वीच वितळून जातात. सूर्याच्या पृष्ठभागावर धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.
१९४५
दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातुन सुटका केली.
१८३५
Houston Skyline
अमेरिकेतील ह्युस्टन शहराची स्थापना झाली.
१८३५
Melbourne Skyline
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.
१५७४
गुरू राम दास
गुरू राम दास शिखांचे चौथे गुरू बनले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९३४
भरा
बाळकृष्ण पंढरीनाथ तथा बाळू गुप्ते – लेग स्पिन गोलंदाज
(मृत्यू: ५ जुलै २००५)
१९३०
दशरथ पुजारी
दशरथ पुजारी – संगीतकार
(मृत्यू: १३ एप्रिल २००८ - डोंबिवली, मुंबई)
१९३०
वॉरन बफे
वॉरन बफे – अमेरिकन उद्योगपती आणि दानशूर, शेअरबाजारातील अत्यन्त यशस्वी गुंतवणूकदार
१९२३
शैलेन्द्र
२०१३ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट
शंकरदास केसरीलाल ऊर्फ 'शैलेन्द्र' – गीतकार
(मृत्यू: १४ डिसेंबर १९६६ - मुंबई, महाराष्ट्र)
१९०४
नवल होर्मुसजी टाटा
नवल होर्मुसजी टाटा – उद्योगपती, रतन टाटा यांचे वडील, पद्मभूषण [१९६९]
(मृत्यू: ५ मे १९८९)
१९०३
भगवतीचरण वर्मा – हिन्दी कथाकार, कादंबरीकार, कवी, एकांकिकाकार, पटकथाकार व नाटककार, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित लेखक
(मृत्यू: ५ ऑक्टोबर १९८१)
१८८३
स्वामी कुवलयानंद
२०१९ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट
जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद – योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ, त्यांनी १९२४ मध्ये 'कैवल्यधाम' नावाची योगशिक्षणसंस्था स्थापन केली. संस्थेतील प्रयोगांची माहिती व्हावी यासाठी 'योगमीमांसा' नावाचे त्रैमासिक काढले. त्याचे ७ खंड प्रकाशित झाले आहेत.
(मृत्यू: १८ एप्रिल १९६६ - मुंबई)
१८७१
अर्नेस्ट रुदरफोर्ड
अर्नेस्ट रुदरफोर्ड – न्यूझीलंडमध्ये जन्मलेले ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते (१९०८)
(मृत्यू: १९ आक्टोबर १९३७)
१८५०
काशिनाथ त्र्यंबक तेलंग – प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, काँग्रेसचे चिटणीस (१८८५-१८८९), मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (१८९२), हिंदू कायद्यात सुधारणा होण्यासाठी त्यांनी प्रयत्‍न केले. भगवद्‌गीतेचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला.
(मृत्यू: १ सप्टेंबर १८९३)
१५६९
जहांगीर
मिर्झा नूर-उद-दीन बेग मोहम्मद खान सलीम उर्फ जहांगीर – ४ था मुघल सम्राट
(मृत्यू: २८ आक्टोबर १६२७ - राजौरी, जम्मू काश्मीर)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००३
चार्ल्स ब्रॉन्सन
चार्ल्स ब्रॉन्सन – अमेरिकन अभिनेता
(जन्म: ३ नोव्हेंबर १९२१)
१९९८
नरुभाऊ लिमये
नरहर वामन तथा 'नरुभाऊ' लिमये – स्वातंत्र्यसैनिक, निर्भिड पत्रकार व काँग्रेसचे तत्त्वनिष्ठ नेते
(जन्म: ८ नोव्हेंबर १९०९)
१९९४
शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे – प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्‌मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख
(जन्म: ५ फेब्रुवारी १९१४)
१९८१
जयंत पांडुरंग तथा 'जे. पी.' नाईक – शिक्षणतज्ञ, 'इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन'चे संस्थापक, 'नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग'चे संस्थापक, भारतामध्ये प्रथमच स्थापन केल्या गेलेल्या शैक्षणिक आयोगाचे सभासद सचिव
(जन्म: ५ सप्टेंबर १९०७)
१९४७
नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ 'कवी बी' – त्यांची 'चाफा बोलेना, चाफा चालेना ...' ही कविता खूप प्रसिद्ध आहे.
(जन्म: १ जून १८७२)
१९४०
जे. जे. थॉमसन
सर जे. जे. थॉमसन – इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: १८ डिसेंबर १८५६)
१७७३
सुमेर गार्दी याने नारायणराव पेशवे यांची शनिवारवाड्यात हत्या केली. नारायणराव पेशव्यांना आपल्याविरुद्ध गारद्यांनी केलेल्या कटाची कुणकुण लागली होती. ३० ऑगस्ट १९७३ ला दुपारी पर्वतीवरुन भोजन करुन परत येताना त्यांनी सरदार हरिपंत फडके यांना त्याबाबत बंदोबस्त करण्यास सांगितले. मात्र फडक्यांना एके ठिकाणी भोजनाचे निमंत्रण होते, तेथून आल्यावर बंदोबस्त करतो, असे त्यांनी सांगितले. मात्र दुपारीच नारायणरावांचा खून झाला.
(जन्म: १० ऑगस्ट १७५५)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================