रक्षाबंधन-लेख-1-A

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 05:23:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "रक्षाबंधन"
                                     -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर एक महत्त्वाचा लेख.   

     द्रुक पंचांगानुसार या वर्षी श्रावण मासातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा 30 ऑगस्टला सकाळी 10.58 वाजता सुरू होत असून ती 31 ऑगस्टला सकाळी 07.05 वाजता समाप्त होत आहे. या आधारावर, 2023 मध्ये रक्षाबंधन बुधवार, 30 ऑगस्ट रोजी साजरे केले जाईल, कारण पौर्णिमा 31 ऑगस्टच्या सकाळीच संपणार आहे.

              रक्षाबंधन 2023 संपूर्ण माहिती--

     नमस्कार मित्रानो रक्षाबंधन 2023 या प्लॅटफॉर्म वर आपले स्वागत आहे.आपण आज या ब्लॉग मध्ये आपण रक्षाबंधन या सणाची माहिती पाहणार आहोत.सोबतच रक्षाबंधन हा सन केव्हा साजरा केला जातो, रक्षा बंधन हा सन २०२३ मध्ये कधी आहे.रक्षाबंधन वर तुम्हाला बरीच काही महत्वाची माहिती या लेखा मध्ये वाचायला मिळेल.

     भारतीय संस्कृतीत सणांना विशिष्ट महत्त्व आहे, भारत देशामध्ये विविध सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. भारत देश हा अनेक सणांनी व परंपरेने नटलेला आहे.परस्त्रीला मातेसमान मनाला जाणारा हा भारत देश आहे.हि शिकवण आपल्या राजाने म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी या रयतेला दिली.हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पर स्त्री बद्दल विचार आहेत.

पर स्त्री ही आम्हाला मातेसमान,
स्त्रीला आम्ही देव्हाऱ्यातील
देवता म्हणतो...!

     आपण सुद्धा हे विचार अंगिकारले पाहिजेत.आपण आजच्या या लेखात रक्षा बंधन माहिती पाहणार आहोत.

             रक्षाबंधन हा सण केव्हा साजरा केला जातो--

     अनेक सणा पैकी रक्षा बंधन हा एक सण आहे.रक्षा बंधन हा सण भारतातील अत्यंत लोकप्रिय असा हा सण आहे.हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो.या सणाला नारळी पौर्णिमा किंव्हा राखी पौर्णिमा असेही म्हणतात.तसेच हा सण बहीण भावाच्या पवित्र बंधनाचा सण आहे.

     श्रावण महिना हा हिंदू कॅलेंडरातील सध्याचा पंचम महिना असतो. या महिन्यात श्रावण सोमवारांनी प्रारंभ होतो आणि भाद्रपद महिन्यात समाप्त होतो. हा महिना नवीन आणि उन्हाळ्याच्या महिन्यांपैकी एक असतो.

     श्रावण महिन्यात भगवान शिवाची (महादेवाची) पूजा केली जाते, आणि शिवलिंगाच्या उपासनेत लाखों श्रद्धाळु भक्त जुळून येतात. इतर धार्मिक सण जसे नागपंचमी, कृष्ण जन्माष्टमी, रक्षाबंधन या प्रकारचे अनेक सण या श्रावण महिन्यात येतात.श्रावण महिना हा विविध प्रकारचे सण घेऊन येतो.

     बहीण भावाच्या प्रेमाची आठवण करून देणारा हा सण आहे. बहीण भावाचे सुंदर व प्रेमळ नाते दर्शविणारा हा सण आहे.रक्षा म्हणजे रक्षण करणारा व बंधन म्हणजे एक प्रकारचा धागा.रक्षाबंधन म्हणजे रक्षणाचा बांधलेला पवित्र धागा.

     राखीचा धागा केवळ साधा सुती धागा नसून ते एक शांततेचे, आपुलकीचे, प्रेमाचे आणि पवित्रेचे रक्षण करणारे पवित्र बंधन आहे. या सणा-मागे अशीही कथा आहे कि, महाभारतामध्ये द्रोपदी ने शिशुपालाच्या वधा वेळी श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाल्यावर एक क्षणाचाही विलंब न लावता द्रोपदी ने आपल्या साडीचा धागा फाडून श्रीकृष्णाच्या जखमेवर बांधला.तेव्हा पासून श्रीकृष्णाने द्रोपदी ला आपली बहीण मानून सदैव तिचे रक्षण करण्याचे ठरवले.

     रक्षा बंधन हा भारतातील सर्वात मोठा परिवारिक उत्सव असतो. या उत्सवाचे मुख्य उद्देश आहे भाऊ-बहिणींच्या प्रेमाची शक्ती आणि दोन्हींच्यातील अथवा एका संबंधातील दृढता बळी देणे. रक्षा बंधन चे शब्द "रक्षा" आणि "बंधन" या दोन शब्दांचे संयोजन आहे. याचा अर्थ आहे की, ज्यांना रक्षा देण्याची इच्छा आहे त्यांना रक्षाबंधन माध्यमातून त्यांच्या दोन अस्तित्वांचे बंधन बळी देणे. हा उत्सव हिंदू कॅलेंडरानुसार श्रावण पूर्णिमेला असतो.

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-रक्षाबंधन २०२३.कॉम)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================