रक्षाबंधन-लेख-1-B

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 05:25:32 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                       "रक्षाबंधन"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर एक महत्त्वाचा लेख.

        रक्षाबंधनाची विविध परंपरा- भारतातील विविध प्रांतांमध्ये आहेत. उत्तर भारतातील माहाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि हरियाणामध्ये या उत्सवाचा विशेष महत्त्व आहे. रक्षाबंधन चे साजरे दिवसाच्या पूर्वाह्नी सुरु होतात. भाऊंनी आणि बहिणेंनी उत्सवाच्या दिवशी उत्तम दुध, शांतता, तुळस आणि अख्खा माला तयार करतात.

     या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर तिलक लावून त्याच्या मनगटावर राखी बांधते. भावाला ओवाळते. भावाच्या सुखी, निरोगी, आनंदी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊही या दिवशी बहिणीला रक्षण करणा। वचन देतो. प्रत्येक भाऊ-बहिणीच्या दृष्टीने या सणाला अमूल्य महत्त्व दिले जाते.

     या दिवशी बहीण भावाला गोड पदार्थ खाऊ घालते व भाऊ ही आपल्या प्रिय बहीणीला भेटवस्तू देतो.आजच्या युगात रक्षाबंधन हा सण केवळ भाऊ- वहीण यांच्यापूर्ता मर्यादीत न ठेवता निसर्गाची पूजा, गुरुंची पूजा, आई- वडीलांची पूजा करून हा सण साजरा करावा. रक्षाबंधन हा सण शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारा सण आहे.

     रक्षा बंधन या सणाच्या आपणा सर्वांना मनः पूर्वक शुभेच्छा!

                FAQ--

--Q1 रक्षा बंधन या सणाचे महत्व काय आहे?

--Answer रक्षाबंधन हा सण अनेक वर्षापासून भारतीय संस्कृती चा एक पाया मानला जातो.शतकानुशतके भारतामध्ये रक्षा बंधन हा सन साजरा केला जातो.रक्षाबंधन म्हणजे बांधलेल्या धाग्याचा संदर्भ आहे, ज्यामध्ये बहिणी आपल्या भावांच्या कपाळावर टिळक लावते आणि जीवनाच्या प्रत्येक संघर्षात आणि आघाडीवर यश मिळवण्यासाठी आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी देवाकडे प्रार्थना करते.

--Q2 रक्षा बंधन कश्याच प्रतिक आहे?

--Answer बहिण आणि भावा मध्ये असलेल्या प्रेमाच प्रतिक म्हणजे रक्षा बंधन.बहीण भावाच्या प्रेमाची आठवण करून देणारा हा सण आहे. बहीण भावाचे सुंदर व प्रेमळ नाते दर्शविणारा हा सण आहे.रक्षा म्हणजे रक्षण करणारा व बंधन म्हणजे एक प्रकारचा धागा.रक्षा बंधन म्हणजे रक्षणाचा बांधलेला पवित्र धागा.

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-रक्षाबंधन २०२३.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================