रक्षाबंधन-लेख-4

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 05:30:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "रक्षाबंधन"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर एक महत्त्वाचा लेख.

                      रक्षाबंधन माहिती--

              रक्षाबंधन इतिहास –

     सर्वप्रथम रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली आणि कुणी केली, याबाबत इतिहासमध्ये ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. परंतु इतिहासात डोकावले तर आपल्या लक्षात येते की, रक्षाबंधनाचा इतिहास हा खूप जुना असून यासंबंधी पौराणिक कथा दंतकथांचा उल्लेख केलेला आढळून येतो.

     महाभारतामध्ये असा उल्लेख आहे की, श्रीकृष्‍णाच्या हाताच्या बोटाला जखम झालेली आणि त्यातून रक्त वाहत होते, त्यावेळी पांडव पत्नी द्रौपदीने आपल्या साडीची किनार फाडून श्रीकृष्‍णाच्या बोटाला बांधली आणि त्याचा रक्तस्राव थांबवला होता. तेव्हापासून श्री कृष्णाने आपली बहीण द्रौपदीचे रक्षण करण्‍याचे वचन दिले आणि वस्त्रहरण प्रसंगी त्याने दौपदीचा भाऊ म्हणून तिचे रक्षण केले.

     एका आख्यायिकेनुसार इसवी सन पूर्व ३२६ मध्ये जेव्हा सिकंदर भारतात आला. त्यावेळी सिकंदरची बायको रोषन हिने राजा पौरसला एक राखी पाठवली होती आणि त्या राखीसोबत तिने राजाकडून एक वचन घेतले होते की, सिकंदरवर राजा कधीही वार करणार नाही आणि राजाने ही या वाचनाचा मान ठेऊन जेव्हा जेव्हा त्या हातात बांधलेले राखीकडे त्याचे लक्ष गेले, त्यावेळी राजाने सिकंदरवर कोणताही वैयक्तिक हमला केला नाही.

     सन १९०५ मध्ये बंगालमध्ये जेव्हा ब्रिटिश सरकारने जाती जातीवरून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालमधील हिंदू आणि मुस्लिम लोकांमध्ये एकता टिकून राहावी, यासाठी राखीची प्रथा सुरू केली आणि संपूर्ण देशामध्ये या एकतेचा संदेश देऊन या राखी बंधनाची सुरुवात केली.

     एका ऐतिहासिक कथेनुसार राणी कर्णावती आणि हुमायू यांचीही एक कथा प्रसिद्ध आहे. सन १५३५ मध्ये ज्यावेळी चित्तोडची राणी कर्णावतीला वाटू लागले, त्यांचं हे राज्य गुजरातच्या सुलतान बहादुर शहा पासून वाचू शकणार नाही. त्यावेळी तिने हुमायुला राखी पाठवून बहिणी या नात्याने मदत मागितली होती, आणि हुमायूनही मदत केली होती. असे सांगितले जाते.

                रक्षाबंधन अर्थ –

     रक्षा आणि बंधन या दोन शब्दांनी मिळून रक्षाबंधन हा शब्द तयार होतो. संस्कृत मध्ये याचा अर्थ संरक्षण करणारे बंधन असा होतो. रक्षा म्हणजे संरक्षण प्रदान करणे, आणि बंधन म्हणजे एक गाठ जी रक्षण करते.

     हे दोन शब्द म्हणजेच भाऊ आणि बहीण असे सुचवले जाते. हे शब्द फक्त रक्ताचे नाते स्पष्ट करत नाहीत तर एक पवित्र नातेसंबंध दर्शवतात.

              रक्षाबंधन सणाची माहिती –

     भारतातील प्रमुख सणांपैकी रक्षाबंधन या सणाला अतिशय महत्त्व आहे. हा सुंदर सण दरवर्षी श्रावणातल्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहिण भावांमधील प्रेमाचे नाते जपण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण, रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.

सणाचे नाव – रक्षाबंधन
दुसरे नाव – राखी पौर्णिमा, पोवती पौर्णिमा
या दिवशी असणारा दुसरा सण – नारळी पौर्णिमा
मराठी महिना – श्रावण
इंग्रजी महिना – ऑगस्ट
साजरा करणारे – सर्व भाऊ बहीण

--by-Team Marathi Zatka
----------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी झटका.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================