रक्षाबंधन-लेख-6

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 05:33:57 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      "रक्षाबंधन"
                                     -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर एक महत्त्वाचा लेख.

                       रक्षाबंधन माहिती--

          भारतामध्ये इतर राज्यांमधील रक्षाबंधन –

१. दक्षिण भारत –
दक्षिण भारतामध्ये रक्षाबंधनाला अवनी अबिथम म्हणून ओळखले जाते. या ठिकाणच्या ब्राह्मणांसाठी या सणाला अधिक महत्त्व आहे. कारण या दिवशी ते अंघोळ केल्यावर मंत्र पठणासह त्यांचा पवित्र धागा ज्याला आपण जानवे असे म्हणतो ते बदलतात.

२. गुजरात –
गुजरात मधील लोक श्रावण सोमवारी शिवलिंगाला जल अर्पण करतात. या दिवशी तेथील लोक पंचगव्यामध्ये कापूस भिजवून शिवलिंगाभोवती बांधतात. या पूजेला या ठिकाणी पावितो पन्ना असे म्हणतात.

३. पश्चिम घाट –
वरूण देवामुळे या ठिकाणी राखी पौर्णिमा साजरी केली जाते, या दिवशी वरूण देवाला नारळ अर्पण केला जातो. म्हणूनच या राखी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हणतात.

४. उत्तर भारत –
रक्षाबंधन हा सण कजरी पौर्णिमा म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. या सणाच्या वेळी गहू आणि इतर धान्य पसरवली जातात. त्या दिवशी माता भगवतीची पूजा केली जाते, आणि चांगल्या पिकाची इच्छा व्यक्त केली जाते.

              रक्षाबंधनाची तयारी –

     या सणाच्या महिनाभर आधी बाजारामध्ये राख्या उपलब्ध होतात. त्यामुळे राख्या घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालेली असते.

     रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळताना नवीन कपडे परिधान केले जातात. त्यासाठी कपड्यांची खरेदी केली जाते.

     बहिण भाऊ एकमेकांना ओवाळल्यानंतर भेट वस्तू देत असतात. त्यामुळे त्या भेट वस्तू कोणत्या, घ्यायच्या कशा घ्यायच्या, याबाबतीत चर्चा सुरू होऊन नंतर त्याची खरेदी केली जाते.

     बाहेरगावी असणाऱ्या भावांसाठी राखी पाठवायची असेल, तर पंधरा दिवस आधी पोस्टामार्फत राखी पाठवली जाते.

--by-Team Marathi Zatka
----------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी झटका.कॉम)
                      --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================