रक्षाबंधन-लेख-7

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 05:35:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "रक्षाबंधन"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर एक महत्त्वाचा लेख.

                     रक्षाबंधन माहिती--

           रक्षाबंधनच्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी –

१. रक्षाबंधन या सणाला राखी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते, त्याचप्रमाणे हा सण मराठी महिन्यात श्रावणामध्ये आल्याने याला श्रावणी असेही म्हणतात.

२. या सणाच्या दिवशी नारळी पौर्णिमा देखील साजरी केली जाते. समुद्रामध्ये नारळ अर्पण करून पाण्यापासून आपल्या सगळ्यांचे रक्षण होण्यासाठी, त्याचप्रमाणे मच्छीमार बांधवांच्या रक्षणासाठी समुद्राला नारळ अर्पण केला जातो. यानंतर मच्छीमार बांधव मासेमारी करण्यासाठी आपल्या होड्या, बोटी समुद्रामध्ये ढकलतात.

३. बहिण भावातील वितुष्ट दूर करण्यासाठी, प्रेमभावना वाढवण्यासाठी हा सण साजरा केला जातो.

४. हा सण साजरा केल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि आनंदाचे असते.

५. हा असा एकमेव सण आहे ज्याला जाती धर्माचे बंधन नाही.

६. हा सण संपूर्ण जगभर साजरा केला जात असल्यामुळे ,धार्मिक त्याचप्रमाणे जातीय एकोपा वाढतो.

                रक्षाबंधन विधी –

या दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण घर साफ करून नंतर अंघोळ केली जाते.

सर्वप्रथम घरातील देवाची पूजा केली जाते.

घरामध्ये नैवेद्य, गोडधोडाचे पदार्थ केले जातात.

राखी बांधण्यासाठी राखीची थाळी सजवली जाते.

राखीच्या थाळीमध्ये निरंजन, अक्षता, चंदन, हळदी, कुंकूचा करंडा, कापूस त्यानंतर मिठाई यांनी ताट सजवले जाते.

पाट मांडून पाटाभोवती रांगोळी काढली जाते.

नंतर बहिण आपल्या भावाला पाटावर बसवते.

प्रथम कपाळावर चंदनाचा कुंकवाचा टिळा लावते त्यानंतर डोक्यावर अक्षता आणि कापूस ठेवते आणि मग निरांजनाने ओवाळते. त्यानंतर ती त्याच्या मनगटावर राखी बांधते, आणि शेवटी मिठाई खाऊ घालते.

भाऊ मोठा असेल तर बहिण त्याला नमस्कार करते, आणि बहीण मोठी असेल तर भाऊ तिला नमस्कार करतो आणि तिच्या थाळीमध्ये ओवाळणी म्हणून भेट वस्तू देतो.

            रक्षाबंधन कधी आहे? Rakshabandhan muhurat 2023 –

यावर्षी ३० ऑगस्ट २०२३ बुधवार या दिवशी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे.
पोर्णिमा तिथी आरंभ – सकाळी १०.५८ सुरू
पौर्णिमा तिथी समाप्त ३१ ऑगस्ट सकाळी ०७.०५ पर्यंत
या दिवशी भद्रकाल देखील सुरू होत आहे. त्यामुळे या वेळामध्ये राखी बांधता येत नाही.
भद्रकाल सकाळी १०.५८ सुरू
भद्रकाल समाप्ती रात्री ०९.१५ पर्यंत.
भद्रकालामध्ये राखी बांधली जात नाही

           information about raksha bandhan–

     धार्मिक शास्त्रामध्ये भद्रकालामध्ये कोणतेही शुभकार्य केले तर ते अशुभ मानले जाते. कारण या भद्रकालामध्ये रावणाच्या बहिणीने त्याला राखी बांधली होती आणि त्याच वर्षी भगवान श्रीरामांनी त्याचा वध करून त्याच्या संपूर्ण वंशाचा नायनाट केला होता. त्यामुळे या काळामध्ये राखी बांधल्याने भावाच्या आयुष्य कमी होते, असे समजले जाते. म्हणून या काळामध्ये राखी बांधली जात नाही.

              रक्षाबंधनाचा विशेष पदार्थ –

     रक्षाबंधन हा दिवस उत्सवाचा तर असतोच, त्याचप्रमाणे मेजवानीचा देखील असतो. या दिवशी अनेक खास पदार्थ केले जातात. काही ठिकाणी लाडू, रसमलाई, गुलाब जामुन, शाही तुकडा, लौकीकी बर्फी, शेवयाची खीर यासारखे पदार्थ केले जातात. या दिवशी नारळी पौर्णिमा देखील असते. त्यामुळे विशेष करून महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी नारळी भात केला जातो.

--by-Team Marathi Zatka
----------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी झटका.कॉम)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================