रक्षाबंधन-लेख-8

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 05:36:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "रक्षाबंधन"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर एक महत्त्वाचा लेख.

                     रक्षाबंधन माहिती--

              रक्षाबंधन कथा –

     एकदा देव आणि राक्षसांमध्ये युद्ध सुरू असताना देवांचा पराभव होऊ लागला. त्यावेळी देवांचे गुरु ब्रूहस्पती यांनी श्रावणी पौर्णिमेला इंद्राच्या हातात अपराजिता नावाचे कवच बांधले, आणि त्यामुळे देव लढाई जिंकले. राक्षसांचा राजा बलि याला दत्तगुरु शुक्राचार्यांनी राखी बांधली आणि त्यामुळे देवांशी झालेल्या एका लढाईमध्ये तो जिंकला.

     याबाबत आणखी एका पौराणिक आख्यायिकेनुसार विष्णूने वामन अवतार घेऊन बळीराजाला पाताळात ढकलले. या पापामुळे विष्णूला बळीराजाच्या वाड्यावर द्वारपाल म्हणून राहावे लागले. त्याची ही अवस्था पाहून माता लक्ष्मीला फार वाईट वाटले, आणि विष्णूला या सगळ्यातून सोडवण्यासाठी माता लक्ष्मीने नारद मुनिंना एक युक्ती सांगितली. या युक्तीनुसार लक्ष्मी बळीराजाला भेटायला गेली. आपल्या घरी माता लक्ष्मी आलेली पाहून बळीराजाला फार आनंद झाला. त्याने तिचे स्वागत केले आणि विचारले की मी आपली काय सेवा करू ?

     त्यावेळी लक्ष्मी म्हणाली की मी आपल्याला राखी बांधायला आले आहे, आणि लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधली. बहिणीला भेट द्यायला हवी म्हणून बळीराजांनी विष्णूला द्वारपाल होण्यापासून मुक्त केले आणि लक्ष्मी आणि विष्णू दोघेही आनंदाने घरी परतले.

             Rakshabandhan 2023 FAQ –

--रक्षाबंधन या सणाचे दुसरे नाव काय?
--रक्षाबंधन या सणाला राखी पौर्णिमा असेही म्हटले जाते.

--2023 मध्ये राखी पौर्णिमा कोणत्या तारखेला आहे?
--2023 मध्ये राखी पौर्णिमा ही 30 ऑगस्ट बुधवारी आहे.

--रक्षाबंधनचा अर्थ काय आहे?
--रक्षाबंधन रक्षण करणे आणि बंधन म्हणजे बांधले जाणे.

--रक्षाबंधन हा कोण साजरी करतात?
--रक्षाबंधन प्रत्येक भाऊ-बहीण साजरे करतात.

--या सणाच्या दिवशी कोणत्या हातावर भावाला राखी बांधली जाते?
--या सणा दिवशी भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधली जाते.

--by-Team Marathi Zatka
----------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी झटका.कॉम)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================