रक्षाबंधन-लेख-10

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 05:38:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "रक्षाबंधन"
                                     -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर एक महत्त्वाचा लेख.

     दरवर्षी श्रावण पौर्णिमा किंवा रक्षाबंधन हा सण 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान येतो, परंतु यावर्षी श्रावण महिन्यात अधिक महिना आहे. या कारणास्तव, श्रावण एक ऐवजी दोन महिन्यांचा असेल.

             रक्षाबंधन (Rakshabandhan 2023)--

     हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. श्रावण महिन्यात साजऱ्या होणाऱ्या या सणाची बंधू-भगिनी आतुरतेने वाट पाहतात. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. दरवर्षी श्रावण पौर्णिमा किंवा रक्षाबंधन हा सण 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान येतो, परंतु यावर्षी श्रावण महिन्यात अधिक महिना आहे. या कारणास्तव, श्रावण एक ऐवजी दोन महिन्यांचा असेल. श्रावण 18 जुलैपासून सुरू होईल आणि 15 सप्टेंबरला संपेल. अशा प्रकारे रक्षाबंधन नेहमीपेक्षा सुमारे 15 दिवस उशिराने साजरा केला जाईल. एवढेच नाही तर रक्षाबंधन एका ऐवजी दोन दिवस साजरे केले जाणार आहे. एवढेच नाही तर रक्षाबंधनाच्या दिवशीही भाद्र येणार आहे.

             रक्षाबंधन 2 दिवस साजरे केले जाऊ शकते--

     हिंदू कॅलेंडरनुसार, या वर्षी श्रावण महिन्याची पौर्णिमा 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.58 ते 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7.58 पर्यंत सुरू आहे. अशाप्रकारे, रक्षाबंधन साजरा करण्याचा शुभ मुहूर्त 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.58 वाजल्यापासून सुरू होतो आणि 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7.58 पर्यंत चालू राहील. म्हणजेच रक्षाबंधन दोन्ही दिवशी साजरे करता येईल. पण 30 ऑगस्टच्या सकाळी 10.58 वाजता भद्रा सुरू होईल आणि 30 ऑगस्टच्या रात्री 9.15 वाजता संपेल. त्यामुळे 30 ऑगस्ट रोजी रात्री 9:01 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7:05 पर्यंत बहिणी आपल्या भावांना राखी बांधू शकतील.

             म्हणूनच भद्रकालात राखी बांधली जात नाही--

     धार्मिक शास्त्रांमध्ये भद्रकाल हे शुभ कार्य करण्यासाठी अशुभ मानले गेले आहे. भाद्र काळात केलेले शुभ कार्यही अशुभ फळ देते. विशेषत: भद्रामध्ये राखी बांधण्यास सक्त मनाई आहे. खरे तर भाद्र काळात रावणाच्या बहिणीने त्याला राखी बांधली होती आणि त्याच वर्षी भगवान रामाने लंकापती रावणाचा वध केला होता. एवढेच नाही तर रावणाच्या संपूर्ण वंशाचा नायनाट केला. त्यामुळे भाद्रमध्ये राखी बांधल्याने भावाचे आयुष्य कमी होते अशी धार्मिक मान्यता आहे.

--नितीश गाडगे
--------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-tv९ मराठी.कॉम)
                      ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================