रक्षाबंधन-कविता-4-ती आली...!

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 05:45:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                       "रक्षाबंधन"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर कविता.   

                                     "ती आली...!"
                                    --------------

ती आली ....!!


आज रक्षाबंधन

इतकी वर्ष वाट पहात होतो

बहुदा मी

माझी माणस

तिला सक्षम


वाटत नव्हतो

ती बरेच दिवस

आतल्या आत

कुढत होती कण्हत होती

आज ती आली


तिला मी ,माझी माणस

सक्षम असल्याची

खात्री पटली

मी तिचे स्वागत केले


आणि राखी बांधून घेतली

तिच्या रक्षणाची खात्री

तिच्या डोळ्यात पाहिली

बरे वाटले


नतमस्तक झालो

आशीर्वाद घेतला आणि

डोळे उघडून

तिचे दर्शन घेतले


ती भारत माता

कुतूहलाने कौतुकाने विश्वासाने

माझ्याकडे पहात होती


डोळ्यातून गंगा यमुना वहात होत्या

आणि डोईवर मायेचा

कृपेचा अभिषेक होत होता....

आज रक्षाबंधन

अविस्मरणीय पार पडले....!!!

--प्रशांत शिंदे
------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                      -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================