रक्षाबंधन-हार्दिक शुभेच्छा-3

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:15:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                       "रक्षाबंधन"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर हार्दिक शुभेच्छा.

     रक्षाबंधन एक महत्वाचा सामारंभ आहे, ज्यामुळे बंधूंच्या नात्यांमधील भावना वाढते आणि मजबूत होते. हा पर्व एक महत्त्वाचा दिवस आहे, ज्यामुळे बहिणांना व भाऊंना अपार प्रेम, स्नेह आणि मायबोळी दर्शविण्याची संधी मिळते. दरात आपण आपल्या बंधूंच्या आत्मिक व्यापाराला शक्यतो, परंतु रक्षाबंधन दिवसी त्यांना हातातचा सौभाग्य वाटतो.

              रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा--

=========================================
--लहानपणी तुझ्या कितीतरी चुकांचा फटका मी खाल्ला आहे
कारण तुझ्या रक्षणाचा विडा जो उचलला आहे


--यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो तुला वचन
सदैव करेन तुझं रक्षण


--नात्याने तू असशील मोठा,

पण तरीही मी आहे तुझी सावली,

आयुष्यभर तुला जपण्याचे वचन दिले मी आपल्या माऊली

लग्न झाले तरी तुझ्यापासून मनाने कधीच दूर जाणार नाही,

कोणीही कितीही म्हणाले तरी साथ तुझी कधीही सोडणार नाही


--आयुष्यात कुठल्याही क्षणी..

कुठल्याही वळणावर...

कुठल्याही संकटात....

हक्कानं तुलाच हाक मारणार

विश्वास आहे माझा तुझ्या वरचा

धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णासारखा.

🎁 रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎁


--काही नाती खूप अनमोल असतात,

हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील...

तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,

आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल...


--आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या हातावर बांधलेल्या

राखीला जागून भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.

रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह,प्रेम,नाते वृध्दिँगत होते.

🎉आपणास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉


--एक नातं विश्वासाचं एक नातं प्रेमाचं,

रक्षाबंधन भावा बहिणीच्या पवित्र

नात्याच्या हार्दिक शुभेच्या..!


--सगळा आनंद सगळं सौख्य,

सगळ्या स्वप्नांची पूर्णता,

यशाची सगळी शिखरं,

सगळं ऐश्वर्य तुला मिळू दे...

हे रक्षाबंधन आपल्या नात्याला

एक नवा उजाळा देऊ दे...

हैप्पी रक्षाबंधन..


--"राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे,
राखी एक विश्वास आहे,
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र मी तुला देऊ इच्छितो."


--"भाऊ बहीण सख्खे असो की चुलत
पण वेळ पडल्यावर एकमेकांना साथ नक्की देतात."
=========================================

--अनिकेत
----------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-१०० पोएम्स.इन)
                        ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================