रक्षाबंधन-हार्दिक शुभेच्छा-7

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:22:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      "रक्षाबंधन"
                                     -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर हार्दिक शुभेच्छा.

           रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा--

=========================================
--"बंध हा प्रेमाचा नाव जयाचे राखी बांधीते
भाऊराया आज तुझ्या हाती."


--"मानलेल्या बहीण भावाचं नात हे रक्ताचं नसल
तरी ते रक्ताच्या नात्यापेक्षाही खूप श्रेष्ठ असतं,
जे फक्त सुखात नाही तर दुःखात साथ देत
तेच खर बहीण भावाचं नात असत."


--"राखी आपल नात जोडणारा एक रेशीम धागा आहे."


--चंदनाचा टिळा, हाती रेशमी धागा

श्रावणाची सर, आनंदाची बहर

भावा-बहिनीच्या आनंदाचा हा सण

सर्वांना माझ्याकडून हॅप्पी रक्षाबंधन..!


--गत जन्माचे संचित म्हणावे

असा लाभला भाऊराया...

माणूसकीला नाही तोड तुझ्या

अशी निर्मळ वेडी तुझी माया.

सगळ्या सुखदुःखात माझ्या सोबत असतो

आमच्यासाठी आमचा भाऊ दिवसरात्र राबतो .

रक्षाबंधन शुभेच्छा


--जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ

नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस

🎁🎊 HAPPY RAKSHA BANDHAN! 🎁🎊


--आधार तू माझा,
मी तुझा विश्वास
येतेस ना ताई मला फक्त तुझीच वाट,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा


--लहानपणीच्या प्रत्येक दिवसाची आठवण करुन देते रक्षाबंधन..
तुझे माझ्यावरील प्रेम राहूदे असेच चिरंतन


--तू बांधलेली राखी मी जीवापेक्षा जास्त जपतो,
कारण जेव्हा तू जवळ नसते.
त्यावेळी तुझ्या प्रेमाची ती मला सतत आठवण करुन देते.


--रक्षाबंधनाच्या अगनित शुभेच्छा

बहीण आणि भावाचे नाते हे सगळ्यात

प्रेमळ असे नाते असते ,त्यात प्रेम पण खूप

असते कधी भाडंण होते तर कधी खूप

आठवण येते असे हे नाते असते ... 🎁


--जन्म झाला तुझा आनंद झाला आम्हा,

तुझ्यामुळे मला मिळाला आनंदाचा वसा,

भावा, तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
=========================================

--अनिकेत
----------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-१०० पोएम्स.इन)
                       ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================