आवडता पक्षी--बदक !

Started by maxo, October 25, 2010, 10:54:48 AM

Previous topic - Next topic

maxo


.......आवडता पक्षी--बदक !!....
बदक मला आवडते!!..बदक पाण्यात असते !!..मी पण पाणी पितो!!आमच्या बाजूचे बबन काका दारू पितात!!..दारू वाईट असते असे गांधीजी सांगत!!..गांधीजी मोट्ठे नेते होते!!..पण त्यांच्या हातात काठी पण असते!!..काठी पाण्यावर तरंगते..व बदक सुद्धा तरंगते!!..बदक जास्त उड़त नाही..पण पोहते..मी पण swimming ला जाणार आहे!!.बदक वाकड्या पायाने चालते..आमच्या building मधल्या सुलेखाला आम्ही बदक म्हणतो! (सुलेखाताइने मला काठीने मारले!!)..बदक काठीने मारत नाही!!..गांधीजी काठी वापरत;म्हणुन आपला देश लवकर स्वतंत्र झाला...आमच्या घरी कपडे वाळत घालायला काठी वापरतात!!..(आमची आज्जी कुत्र्यांना घबरवायला काठी वापरते!!)..आमच्या घरात चिमण्या व कबुतरे येतात...खिडकीपाशी कावले पण येतात..!!पण बदक येत नाही!!..कारण ते उंच उडू शकत नाही!!..(आम्ही १ st floor ला राहतो)...पण बदक पाण्यात रोज आंघोळ करते!! ..मी पण आंघोळ करतो..कारण आई ओरडत असते!!..पण मी पाच मिनीटात आंघोळ करतो!!बदक रोज आंघोळ करते म्हणुन ते गोरे असते ...(पण काले बदक सुद्धा असते ...ते बहुतेक आंघोळ करत नाही!!)...मला बदक खुप आवडते!

rudra


MK ADMIN