रक्षाबंधन-हार्दिक शुभेच्छा-8

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:23:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "रक्षाबंधन"
                                     -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर हार्दिक शुभेच्छा.

            रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा--

=========================================
--तुझ्या जन्माच्यावेळीच आईने माझ्याकडून घेतले वचन..
आता राखी बांधून करतोय तुझे सगळ्या संकटातून रक्षण


--रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन

घेऊन आला हा श्रावण

लाख लाख शुभेच्छा तुला

आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण

🎁 🎉रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!🎉 🎁


--नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ,

मी सदैव जपलंय...

हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी....

आज सारं सारं आठवले....

हातातल्या राखी सोबतच, भाव मनी दाटले...

बंध हे प्रेमाचे नाते आहे...

ताई तुझ आणि माझ नातं जन्मोजन्माचे आहे..


--श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे

भाऊ माझा यशाने न्हाऊ दे...

राखी शिवाय काही नाही माझ्याकडे...

हीच आहे माझी इच्छा भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Rakshabandhan


--रक्षाबंधन सण हा वर्षाचा,

आहे रक्षाबंधनाचा..

नेत्रांचा निरांजनाने, भावास ओवळण्याचा..

कृष्ण जसा द्रौपदीस, तसा लाभल्यास तू मला..

ओवाळते भाऊराया, औक्ष माझे लाभो तुला..

असा आनंद सोहळा, तुज वीण सुना सुना..

इथून ओवाळीते मी, समजून घे भावना..


--"रक्षणाचे वचन प्रेमाचे बंधन घेऊन आला
हा श्रावण लाख लाख शुभेच्छा आला
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण."


--"काही नाती खूप अनमोल असतात
हातातील राखी मला याची कायम आठवण देत राहील,
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलंच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल."
=========================================

--अनिकेत
----------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-१०० पोएम्स.इन)
                       ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================