रक्षाबंधन-शुभेच्छा संदेश

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:38:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "रक्षाबंधन"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन शुभेच्छा संदेश.

          Raksha Bandhan Messages-रक्षाबंधन शुभेच्छा संदेश--

      रक्षाबंधनाच्या या खास दिवसासाठी आम्ही काही खास रक्षाबंधन शुभेच्छा संदेश (Raksha Bandhan Messages) निवडले आहेत. जे पाठवून तुम्ही शुभेच्छा देऊ शकाल.

=========================================
राखी हा धागा नाही नुसता, हा विश्वास तुझ्या माझ्यातला.. आयुष्यात कुठल्याही क्षणी कुठल्याही वळणावर हक्कानं तुलाच हाक मारणार हा विश्वास आहे तुझ्या बहिणीचा

राखी प्रेमाचं प्रतीक,राखी प्रेमाचा विश्वास, तुझ्या रक्षणासाठी मी सदैव असेन हा विश्वास

राखी म्हणजे नुसता दोरा नाही. तर आहे एक अतुट विश्वास.. कधी येतोयस भाऊराया आता मला फक्त तुझीच आस

लहानपणी चांगली राखी आणली नाही म्हणून पटकन चिडायचास.. आता मात्र राखी पाहिल्यावर(मला) डोळ्यात पाणी येतं

कोणती राखी तुझ्यासाठी निवडू असा नेहमीच प्रश्न पडतो पण कोणतीही राखी आणली तरी तू तुझे काम अगदी जबाबदारीने पार पाडतोस.

भावाची माया माझी तुझ्यावरी कधीही होणार नाही कमी, त्यासाठी हा दिवसही आहे कमी

भाऊ मी तुझा तू माझी लाडकी बहिणाबाई,
माझ्यासोबत तू कायम राही, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

वचन देतो तुला मी कायम तुझ्या पाठीशी राहीन
कायम तुला प्रेमाने सांभाळत राहीन
लहान भाऊ मी तुझा करतो मनापासून प्रेम ताई,
चुकलो तर माफ कर पण तुझ्याशिवाय जीवन माझे व्यर्थ जाईल
तुझे निखळ प्रेम कधीच कोणी भरुन काढता येणार नाही, तुला त्रास दिल्याशिवाय माझा एकही दिवस जाणार नाही.
=========================================

--LEENAL GAWADE
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================