रक्षाबंधन-शायरी

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:45:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "रक्षाबंधन"
                                    -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन शायरी.

                 Raksha Bandhan Shayari-रक्षाबंधन शायरी--

        रक्षाबंधनाचा हा दिवस खास करण्यासाठी आम्ही काही खास शायरी (Raksha Bandhan Shayari) ही शोधून काढल्या आहेत. त्यादेखील तुम्ही ठेवू शकता.

=========================================
राखीचा सण आला आनंदाचा... बहीण-भावासोबत एकत्र साजरा करण्याचा, राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

भावाच्या हातावर राखी बांधून मिळते एक समाधान... सोबत असल्याचा असतो तो एक विश्वास

बहीण- भावाचे नाते दृढ करते हा एक धागा... सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

एक भाऊ असला तरी मिळते एक समधान.. सोबत असल्याचा तो असतो एक विश्वास

बहीण- भावासाठी हा दिवस असतो फारच खास... होतो एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव

दादा, तू आहेस म्हणून असते मी इतकी बिनधास्त... तुझ्यामुळेच आहे माझ्यात हा आत्मविश्वास

देवाकडे आहे एकच मागणे... मिळावा असा भाऊ-बहीण प्रत्येक जन्मात

कोणत्याच नात्यात ओढ नाही, पण भाऊ-बहिणीचे नाते आहे गोड, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

आईपेक्षाही जास्त प्रेम करणारी फक्त ताई असते, कारण तीच सगळे समजून घेऊन  लाड पुरवत असते, आयुष्यात कधीही लागली ताई तुला माझी गरज.. समोर नेहमीच मी असेन हजर

जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते दादा मला नेहमीच तुला भेटायची आस असते.
=========================================

--LEENAL GAWADE
----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================