रक्षाबंधन-हृदयस्पर्शी रक्षाबंधन शुभेच्छा

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:47:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "रक्षाबंधन"
                                     -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हृदयस्पर्शी रक्षाबंधन शुभेच्छा.

        Heart Touching Raksha Bandhan Quotes-हृदयस्पर्शी रक्षाबंधन शुभेच्छा--

       रक्षाबंधनाच्या या खास प्रसंगी मनात वेगवेगळ्या भावना दाटून येतात. या सगळ्या भावनांना शब्दरुपी मार्गाने वाट मोकळी करुन दिल्यास त्या अधिक स्पष्टपणे व्यक्त करता येतात. त्यासाठीच खास रक्षाबंधन विचार (Raksha Bandhan Thoughts)

=========================================
हातातील राखी म्हणजे प्रत्येक भावाला देवाने दिलेले वरदान, आपल्या बहिणीला जपण्याचे

नातं- तुझं माझं अगदी या राखीसारखं... कधी रंगीत.. तर कधी मऊ कापसासारखं

इवल्याशा राखीत काय असे अनेकांना वाटते. पण तीच राखी माझ्या जगण्याची उमेद वाढवते.

राखी बांधल्यानंतर प्रत्येक भावाची छाती 56 इंचाची होते. कारण जगातली ती सगळ्यात मोठी जबाबदारी असते.

लहानपणी राखी बांधायला आवडायची नाही. आता तू दूर गेल्यावर रिकामी मनगट आवडत नाही.

राखी देते विश्वास, भावा- बहिणींच्या नाते करते खास

मला त्रास द्यायला तुला भारीच आवडते. पण मला जरा काही झाले की, तुझे मन लगेच कावरेबावरे होते.

आई घरी नसताना तूच घेतली माझी काळजी.. आता मोठी झाले म्हणून काय झाले.. आजही प्रत्येक क्षणी मला गरज तुझी

कितीही चिडलास तरी तूझं आहे माझ्यावर प्रेम.. मी तुझी मोठी ताई आणि तू माझं पहिलं प्रेम, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

दादा दादा करुन तुला आयुष्यभर मी त्रास देणार.. आताच सांगते राखीची ही गाठ कधीच नाही सुटणार
=========================================

--LEENAL GAWADE
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================