रक्षाबंधन-Whatsapp साठी रक्षाबंधन शुभेच्छा

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:48:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "रक्षाबंधन"
                                     -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, Whatsapp साठी रक्षाबंधन शुभेच्छा.

          Whatsapp Raksha Bandhan Quotes-Whatsapp साठी रक्षाबंधन शुभेच्छा--

         हल्ली पटकन काही पाठवायचं असेल तर आपल्याकडे whatsapp हा पर्याय आहे. त्यासाठीच whatsapp raksha bandhan quotes. पाठवा तुमच्या आयुष्यातील खास व्यक्तीला.

=========================================
भेटता आले नाही म्हणून गिफ्ट घेणार नाही असे कसे होईल,चल गिफ्ट पाठवून दिवस कर पूर्ण

भावा-बहिणीच्या प्रेमाचा दिवस, प्रेमाने भरलेला जावा यासाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

कितीही अंतर असले तरी प्रेम कमी होणार नाही, भावाची तुला शप्पथ

ताई म्हणतो तुला, पण आज येऊ शकत नाही, रागावू नकोस कारण प्रेम तुझ्यावर अजिबात कमी करत नाही

दादा, तुझ्या येण्याची वाट बघतेय रे, विसरु नकोस मला

तुझा दरारा असा की, वाघाला ही वाटेल लाज, माझा भाऊराया आहेच तेवढा खास

माझा मेसेज वाचून तुझ्या ओठांवर आले हसू, हेच तर मला हवे होते

तुझ्यासाठी काहीपण, ताई, तू आहेस आमच्या घराचे घरपण

काहीही केलं तरी तुझी जागा कोणीही घेऊ शकणार नाही, आता गिफ्ट पाठव

नेहमीप्रमाणे काहीही घेतलं नसशील, त्यामुळे आता इथेच राखीही स्विकार
=========================================

--LEENAL GAWADE
----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================