रक्षाबंधन-माहिती

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:54:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "रक्षाबंधन"
                                    -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर माहिती.

               रक्षाबंधन माहिती--

     नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण 30 ऑगस्टला असणारा सण रक्षाबंधन दिनानिमित्त कविता चारोळ्या मराठीमध्ये बघणार आहोत. रक्षाबंधन सणाबद्दलची खालील लेखात दिलेली माहिती तुम्हाला शालेय जीवनात किंवा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नक्की उपयोगी पडतील. खालील लेखात दिलेली सर्व माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.

     भाऊ आणि बहिणीच्या आयुष्यातील एक पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. जिवाभावाच्या नात्याचा एक अलौकिक प्रेमाचा न विसरणारा संगम होय.. रक्षाबंधनाचं एक निम्मित साधून भावाला घरी बोलवून छान जेवायला घालून, भेटून एकत्र गप्पा मारून... सारा दिवस आनंदात साजरा करणे हेच ह्या दिवसाचे वैशिष्ट्य आहे. भावाने दिलेली ओवाळणी आणि बहिणीचे रुसवे फुगवे ह्या मजेशीर वातावरणात मिसळलेला आनंदाचा रंग एक वेगळच रूप बहरून नेतो.

    आपुलकी,जिव्हाळा,प्रेम, सहवास, ओढ, आदर आणि विश्वास या सर्वांचा एकत्रित पवित्र संगम म्हणजे हा सण.

     नटून, सुंदररित्या तयार झालेली आपली बहीण आपली आतुरतेने राखी बांधण्यासाठी अतोनात आपली वाट बघतेय ह्या भावनेतच किती सुख आणि गोड असे हृदयस्पर्शी नाते आहे. निघताना मात्र सर्व गोष्टी डोळ्यासमोरून निघून जात अश्रूंना वाटा फुटत जातात.

     असा हा सोहळा भविष्यात सर्वांच्या जीवनात आनंद आणि ह्या नात्याची सुंदर प्रतिमा तेजत ठेवो.. हीच प्रार्थना.....

             FAQ--

Q.1) रक्षाबंधन 2023 कधी आहे ?
Ans. रक्षाबंधन 30 ऑगस्ट 2023 ला आहे.

Q.2) रक्षाबंधन म्हणजे काय ?
Ans. भाऊ आणि बहिणीच्या आयुष्यातील एक पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन.

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी महिला.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================