वादळ

Started by बाळासाहेब तानवडे, October 25, 2010, 08:56:54 PM

Previous topic - Next topic

बाळासाहेब तानवडे


वादळ

तुझ्या आगमनाची चाहूल लागली.
मने जशी फुलपाखरू झाली.
बालपणीच्या लडिवाळ लीलांनी तुझ्या.
घरा – दाराला आनंदाची भरती आली.

तुझे बाल हट्ट पुरवता – पुरवता.
शिक्षणाचे बाळकडू भरवता – भरवता.
तारुण्याच माप कधी ओलांडलस, ते समजलच नाही.
प्रेमाचा आलाप कधी आळवलास, ते उमजलेच नाही.

आपला जोडीदार स्वताच निवडला.
वर संशोधनात वेळ नाही दवडला.
एक – दुसऱ्यांना तुम्ही समजून घेतले.
आम्ही तुमचे कांहीसे उमजुन घेतले.

पण तुझी निवड कांहीशी अलग होती.
समाज्याच्या नियमाशी न सलग होती.
परिस्थितीची दिली तुला सर्वानी जाण.
तुलाही आल वास्तवाचं काहीस भान.

पण लग्नाच्या गौप्यस्फोटाने केला कहर.
आमचे जीवन झाले, जसे जहर.
शांत घराची रणभूमी झाली.
अखेर तुझी घराला कायमची कमी झाली.

तुझ्या स्वप्नांची फुले झाली.
आम्ही दिलेल्या स्वातंत्र्यामुळे झाली.
मात्र आमची जीवन बागच कोमेजली.
तुला आमची कधी मनेच नाही समजली.

तुझे सुख तू पाहिलेस.
आम्हाला घोंगावणाऱ्या वादळाला वाहीलेस.
तुझ्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्या .
तू मात्र आम्हास समाजाच्या आयुष्यभरच्या चपला दिल्या.

शाहू – फुलेंचे विचार आम्ही मानतो गहन.
पण जनशक्ती पुढे आम्ही पडतो खुपच लहान.
मुठभरांसाठी ठरेल तुझे कृत्य महान.
पण उरलेल्यांसाठी आम्ही ठरू पायची वहान.
कवी : बाळासाहेब तानवडे

टीप : ही पालकांची कैफियत आहे. मुलीची कैफियत माझ्या " प्रेमासाठी ......" या कवितेत मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. " प्रेमासाठी ......" या  कवितेची लिंक  खाली  देलेली आहे.
http://marathikavita.co.in/index.php/topic,4379.0/topicseen.html

©बाळासाहेब तानवडे २५/१०/२०१० 

http://marathikavitablt.blogspot.com/


amoul

khupach chhan kavita aahe !! tyhi peksha ji bhavnachi kaifiyat aahe ti tyhun javalachi vatali.....

santoshi.world


astrocpt

खूपच छान.
वास्तवाचे भान करून दिलेले आहे. :)

बाळासाहेब तानवडे

खुपच छान वाटलं .. तुमच्या प्रतिक्रीया वाचून ... धन्यवाद मित्रानो .......

vinodpawarsap@gmail.com

Kharich reality ahe he.... Pan eka prashnache uttar dyal ka kuni......

jar gharchyancha sammatine .. sarvana sobal  gheun , jar lagna kela tar kay vait ahe.....

Jagacha vichar karun kay upyog ahe kay ......


Vichar karun bagha ... hyach jagacha vichar karun ke kunihi yet nahi madatila.... adchanichya veli....


बाळासाहेब तानवडे

Tumach agadi barobar ahe . Lokani vichar karun apale views badalayala havet. Tenvhach he shakya hoil.