छत्रीची प्रेम कविता-बरसत्या पावसात, भिजल्या रात्री, चिंब भिजूया, नकोय छत्री-A

Started by Atul Kaviraje, August 31, 2023, 10:57:28 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, बरसत्यI पावसातल्या छत्रीची एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "छतरी न खोल बरसात में, भीग जाने दे भीगी रात में"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही पाऊस थांबलेली, हवाही थांबलेली अशी थोडीशी निरुत्साही अशी, गुरुवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( छतरी न खोल बरसात में, भीग जाने दे भीगी रात में )           
---------------------------------------------------------------

               "बरसत्या पावसात, भिजल्या रात्री, चिंब भिजूया, नकोय छत्री"
              -----------------------------------------------------

बरसत्या पावसात, भिजल्या रात्री
चिंब भिजूया, नकोय छत्री
या पावसात लहान होऊया, मुक्त बागडूया,
नाचूया,पाणी उडवुया, हरवलेलं बाल्य पुन्हा आणूया

बरसत्या पावसात, भिजल्या रात्री
चिंब भिजूया, नकोय छत्री
वयाला नसते बंधन पावसात भिजण्या,
सारी बंधने तोडूया, आनंद घेण्या

साजणा, तू छत्री आणली आहेस खरी
पण मला सुचलीय तुझी थट्टा मस्करी
आज मला मनमुराद भिजू दे,
उघडूच नको छत्री, तिला बंदच राहू दे

ही रात्र पहा कशी भिजत आहे, भिगत आहे
या भिग्या रात्रीची एक अनोखी खुमारी चढत आहे
आपणही दोघे या रात्रीचे एक भाग होऊया,
या पावसाच्या आनंद लहरीत बुडून जाऊया

सख्या, असा काय तू मोठयांसारखा वागतोयस
इतक्या लवकर तू जणू पोक्तच होतोयस
चल छत्री सIर बाजूला, मनसोक्त भिजू दे, चिंब होऊ दे मला,
पावसात भिजायची मजाच काही और आहे, सांगतेय मी तुला

ही पावसातील आपली भेट स्मरणात राहील
ही आपली मुलIकात सदैव आठवणीत राहील
तो झरतI, बरसतI पाऊस, आणि त्या पावसात तू आणि मी,
आनंदाला पारावIर नाही आपल्या, इथे काहीही नाहीय कमी

बरसत्या पावसात, भिजल्या रात्री
चिंब भिजूया, नकोय छत्री
इतका कसा रे तू नरम, साजणा,
सर्दी, ताप, खोकल्याची प्रथम करून घे खात्री

बरसत्या पावसात, भिजल्या रात्री
चिंब भिजूया, नकोय छत्री
अरे हीच तर आहे मजा भिजण्याची,
पुन्हा पुन्हा येणार नाही बघ या पावसाच्या रात्री

या पाण्यात भिजून माझी तहान अजुनी वाढत आहे
या गIर जलधारा माझी तहान भागविण्यास कमी पडताहेत
असा कसा तू अनाडी, प्रेमात कच्चा खिलाडी, आता जवळ घे मला,
तुझ्या मिठीतच माझी तृष्णा तृप्त होईल, हेही सांगावं लागतंय तुला

हे पाण्याचे जलद पडणारे थेम्ब मला काट्यागत टोचताहेत
या वाहत्या बोचऱ्या वाऱ्याने अंगावरले रोम रोम फुलताहेत
हा पाऊस थंड करण्याऐवजी देहास नुसता जIळत जातोय,
हा बरसतI बरसतI कसा, शरीराची दाहकता वाढवत राहतोय

माझ्या या मजबूर स्थितीचा तुही आता मजाक उडवतोस
त्या पावसाप्रमाणे तुही माझी मजा घेतोस, गम्मत पाहतोस
तुला याची जाणीव नाही, माझ्या मनात तुझ्यासाठी प्रेम भरलंय,
मला प्रेम दाखवायचं नाही, माझ्या नयनांतून ते तुला दिसलंय

आता तर पावसाचा जोर वाढत चाललाय, तो जोरात बरसू लागलाय
ही रात्रही अति गडद होत जातेय, पावसात भिजून अति गर्द होतेय
वीजIही चमकू लागल्यात तीव्रतेने, ढगही गडगडू लागलेत अति वेगाने,
अश्यात ही छत्री जर उघडली, तर उडून जाईल ती वाऱ्याने

बरसत्या पावसात, भिजल्या रात्री
चिंब भिजूया, नकोय छत्री
हा पाऊस वर्षाकाठी एकदाच येतो,
मस्त भिजूया, भिजण्यात एक आगळा आनंद मिळतो

बरसत्या पावसात, भिजल्या रात्री
चिंब भिजूया, नकोय छत्री
तुझी माझी प्रीत फुलू दे, चिंब भिजू दे,
या छत्रीचे तिला आज बंधन नसू दे


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.08.2023-गुरुवार.
=========================================