पावसातली एक विरह कविता-गीत-हवा महकतेय, घटा बरसतेय, अश्यात मला तुझी आठवण येतेय

Started by Atul Kaviraje, September 01, 2023, 10:44:52 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसातली एक विरह कविता-गीत ऐकवितो. "आजा जाने जा न न न न, बरसे घटा महके हवा, ऐसे में तडपा न"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही पावसाने थोडा वेळ विश्रांती घेतलेली, सुखद वारा वहIत असलेली, लख्ख व चमकदार ऊन पडलेली अशी सुंदर व रम्य, शुक्रवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( आजा जाने जा न न न न, बरसे घटा महके हवा, ऐसे में तडपा न )           
-------------------------------------------------------------------------

             "हवा महकतेय, घटा बरसतेय, अश्यात मला तुझी आठवण येतेय"
            --------------------------------------------------------

हवा महकतेय, घटा बरसतेय
अश्यात मला तुझी आठवण येतेय
ये साजणी, तुझ्या प्रेमास मी तरसतोय,
अशी का मला तू प्रेमात तडपवतेय ?

हवा महकतेय, घटा बरसतेय
अश्यात मला तुझी आठवण येतेय
पावसाच्या जलधारा, हा वाहतI धुंद वIरI,
तुझ्या आठवणींचे पीस हलकेच तरळतेय

पावसानेही पडतI संदेश दिलाय, काही सांगतोय तो
आपल्या सतत बरसत्या जलधारांतून निरोप देतोय तो
असा विरहात राहू नकोस, तुझ्या प्रियेला गमावू नकोस,
तिच्या आठवणींत असा झुरू नकोस, उदास राहू नकोस

ये प्रिये, असं विरहात मला तू जIळू नकोस
ये सखये, असं जुदाईत मला तू पोळू नकोस
तुझ्याविना मी आहे एकटा, आहे अधुरा,
तूच आहेस माझं जीवन, मला यातना देऊ नकोस

एक अज्ञात भीती माझ्या मनाला ग्रासू पाहतेय
तुझ्या अनभिज्ञ काळजीने माझं मन घाबरू लागतेय
तुझी याद येताच, एका अनामिक भयाने व्याप्त होतंय,
तुला मी हरवणार तर नाही ना, ते नेहमीच साशंक होऊ लागतंय

हवा महकतेय, घटा बरसतेय
अश्यात मला तुझी आठवण येतेय
पावसाच्या जलधारात मला तुझा भास होतोय,
संभ्रमात पडलेलं माझं मन, तुला हाक देतंय

हवा महकतेय, घटा बरसतेय
अश्यात मला तुझी आठवण येतेय
मनातील शंका-आशंका गुणगुणू लागल्यात,
तुझ्या आठवणींचं मध-मोहोळ उठून येतंय

माझं एक मन मला सांगू पहIतय, काहीतरी म्हणतय
प्रियाला का शोधतोस तू, ती तर माझ्यात केव्हाची वसलीय
परंतु दुसरं मन विचारतय, तिची माझी भेट तर घडवं,
फक्त पाहूनच मन नकोस भरू, ती कधीची तुला दुरावलीय

तुझ्या आठवणीत हृदयाचे ठोके वाढू लागलेत
ही तेज धडकन तुझंच नाव घेऊ लागलीय
माझा उष्ण श्वास अन माझी अशम्य तहान,
तुझ्या प्रेमाच्या अग्नीत अंगांगाला पेटवीत चाललीय 

आता दूर रहIवत नाही, माझा संयम सुटत चाललाय
तुला सांगणाच्या विवंचनेत मी आहे, मी बेबस झालोय
तुझी शपथ घेऊन सांगतो, आता हे सारं हाताबाहेर निघून गेलंय,
आता मनाला समजावून सांगणं मला जड होत चाललंय

हवा महकतेय, घटा बरसतेय
अश्यात मला तुझी आठवण येतेय
आता वेळ नको लावूस, झुरत नको ठेवूस,
मला असं झुलवत ठेवून, तुला मजा का येतेय ?

हवा महकतेय, घटा बरसतेय
अश्यात मला तुझी आठवण येतेय
मन बहकत जातंय, मन आक्रन्दन करतंय,
हृदयाचं प्रत्येक स्पंदन तुलाच विचारतंय

     मी तुझ्या जवळच आहे, मग तू दु:खी का आहेस ?
     मी तुझ्या मनातच आहे, मग दुःख कशाचे घेऊन बसलास ?
     हा विरह तर थोडIकाळच आहे, मी जरी प्रत्यक्ष नसले,
     माझी आठवण तर तुला सहारा आहे, मी जरी दूर असले

     उगाच काही चूक करू नकोस, स्वतःच्या मनाला आवर
     हातून तुझ्या काही विपरीत घडेल, स्वतःला तू सावर
     इतका तू होऊ नकोस बेहोष, तू तर आहेस माझा जिवलग यार,
     स्वतःच्या रहा तू होशमध्ये, मी तुझ्यावर अजून करते प्यार

     लवकरच तुझं दुःख दूर होईल, तुझी तनहाई दूर होईल
     हा विरह फार काळ नाही टिकणार, तो निघूनही जाईल
     तुझे माझे प्रेम अमर आहे, ते चिरंतन आहे, चिरकाल टिकेल,
     आता स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, हे दुःख जाचत राहील

     थोडी प्रतीक्षा कर, हे तुझं दिल असंच धडकू दे
     अजून थोडी वाट पहा, विरहाग्नी आणि थोडा भडकू दे
     संयमचं आपल्या प्रीतीची घेतोय परीक्षा, योग्य वेळ येऊ दे,
     प्रीतीची मग येईल दुप्पट मजा, आणिक थोडा धीर राहू दे

हवा महकतेय, घटा बरसतेय
अश्यात मला तुझी आठवण येतेय
     प्रियकरI, मी सारं काही जाणून आहे,
     या विरहात तुझीही याद मला सतावतेय

हवा महकतेय, घटा बरसतेय
अश्यात मला तुझी आठवण येतेय
     होईल सारं काही आलबेल लवकरच,
     या पावसाच्या साक्षीनेच तुझी माझी प्रीत उजळतेय

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.09.2023-शुक्रवार.
=========================================