०१-सप्टेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, September 01, 2023, 04:59:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०१.०९.२०२३-शुक्रवार.जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिनविशेष"

                                  "०१-सप्टेंबर-दिनविशेष"
                                 ---------------------

-: दिनविशेष :-
०१ सप्टेंबर
१ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर
राष्ट्रीय पोषक आहार सप्ताह
१९३९ ते १९४५ अशी सहा वर्षे दुसरे महायुद्ध चालले. त्यात मारल्या गेलेल्या सैनिक व नागरिकांची संख्या होती तब्बल साडे पाच कोटी. एकट्या रशियाचेच १ कोटी ३६ लाख सैनिक व ७७ लाख नागरिक त्यात मारले गेले!
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९१
उझबेकिस्तानने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
१९७२
आइसलँडमधील रिकजेविक येथे अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला बुद्धीबळात पराभूत केले आणि तो जगज्जेता बनला.
१९६९
लिबीयात उठाव होऊन हुकूमशहा मुअम्मर गडाफी सतेवर आला.
१९५६
भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना झाली.
१९५१
अर्नेस्ट हेमिंग्वे यांची 'द ओल्ड मॅन अ‍ॅन्ड द सी' ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक व पुलित्झर पुरस्कार मिळाले.
१९४६
महाराष्ट्र ॲसोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स (विज्ञान वर्धिनी, महाराष्ट्र) या संस्थेची स्थापना झाली. ही विज्ञानाच्या विविध शास्त्रांतर्गत संशोधन चालविणारी स्वायत्त व बिनसरकारी संस्था आहे. शं. पु. आधारकर यांनी सूक्ष्मदर्शक कॅमेरा व अनेक प्रयोगोपयोगी उपकरणे आणि वनस्पतिविज्ञानावरील सुमारे ३,००० ग्रंथ संस्थेस विनामूल्य दिले. त्याचप्रमाणे त्यांनी १९४८ ते १९६० या अवधीत संस्थेचे मानद संचालक या नात्याने नेतृत्व केले. त्यांनी अनेक शास्त्रज्ञांना एकत्र आणले, पदव्युत्तर शिक्षणक्रमात मार्गदर्शन केले आणि काही संशोधन-प्रकल्पांत भागही घेतला.
शं. पु. आघारकर यांनी आपली पुणे व मुंबई येथील स्थावर मालमत्ता संस्थेच्या नावावर करून दिली आहे.
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रविज्ञा विभागातर्फे मिळणाऱ्या प्रतिवार्षिक अनुदानावर संस्थेचा खर्च चालतो.
१९३९
जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसर्‍या महायुद्धाची सुरुवात झाली.
१९१४
पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९४९
पी. ए. संगमा – ११ व्या लोकसभेचे सभापती (कार्यकाल: २३ मे १९९६ ते २३ मार्च १९९८) आणि मेघालयचे ४ थे मुख्यमंत्री (कार्यकाल: ६ फेब्रुवारी १९८८ ते २५ मार्च १९९०), प्राध्यापक, वकील, पत्रकार
(मृत्यू: ४ मार्च २०१६)
१९२१
माधव मंत्री – यष्टीरक्षक व उजव्या हाताचे फलंदाज
(मृत्यू: २३ मे २०१४)
१९१५
राजिंदरसिंग बेदी – ऊर्दू कथाकार आणि हिन्दी पटकथालेखक. साहित्य अकादमी पुरस्कार (१९६५), पद्मश्री (१९७२). 'दस्तक' या चित्रपटाची कथा, पटकथा, लेखन व दिग्दर्शन त्यांचे असून या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
(मृत्यू: ? ? १९८४)
१९०८
के. एन. सिंग
कृष्ण नारायण तथा के. एन. सिंग – हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक, भालाफेक आणि गोळाफेक यातही ते निष्णात होते. १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची त्यांना संधी मिळाली होती. परंतु बहिणीच्या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ते त्यात भाग घेऊ शकले नाहीत.
(मृत्यू: ३१ जानेवारी २०००)
१८९६
अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद – हरेकृष्ण पंथाचे संस्थापक
(मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७७)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००८
थॉमस जे. बाटा – बाटा शू कंपनीचे संस्थापक
(जन्म: १७ सप्टेंबर १९१४)
१८९३
काशिनाथ त्र्यंबक तेलंग – प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, काँग्रेसचे चिटणीस (१८८५-१८८९), मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (१८९२), हिंदू कायद्यात सुधारणा होण्यासाठी त्यांनी प्रयत्‍न केले. भगवद्‌गीतेचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला.
(जन्म: ३० ऑगस्ट १८५०)
१५८१
गुरू राम दास
भाई जेठामल सोधी उर्फ गुरू राम दास – शिखांचे ४ थे गुरू. यांनी अमृतसर शहराची स्थापना केली.
(जन्म: २४ सप्टेंबर १५३४)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.09.2023-शुक्रवार.
=========================================