पावसातली विरह कविता-गीत-अश्या का बरसताहेत जलधारा, पाऊस कोणता देतोय इशारा ?

Started by Atul Kaviraje, September 02, 2023, 10:36:17 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसातली एक विरह कविता-गीत ऐकवितो. "ये साज़िश है बूंदों की, कोई ख्वाहिश है चुप-चुप सी"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही घनदाट काळ्या ढगांनी भरलेल्या आकाशाची, आणि थोड्याच वेळात मुसळधार पाऊस सुरु होणारी शनिवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( ये साज़िश है बूंदों की, कोई ख्वाहिश है चुप-चुप सी )           
--------------------------------------------------------------

              "अश्या का बरसताहेत जलधारा, पाऊस कोणता देतोय इशारा ?"
             --------------------------------------------------------

अश्या का बरसताहेत जलधारा
पाऊस कोणता देतोय इशारा
हे पर्जन्य-थेम्ब जणू साजिशच करताहेत,
तुझ्या माझ्या प्रेमाच्या का ते आड येताहेत ?

अश्या का बरसताहेत जलधारा
पाऊस कोणता देतोय इशारा
काय दडलंय आज या पावसाच्या मनी ?,
शांतपणे बरसत असता, माझ्या काहीच येत नाही ध्यानी

ही हवाही आज कशी हळुवारपणे बोलतेय
हा वाराही आज कसा मंद मंद झुलतोय
हे सारं निसर्ग नियमाच्या विरुद्ध नाही का वाटत ?,
हा निसर्ग काहीतरी षडयंत्र रचतोय, निःशब्द रहIत 

आज नक्कीच काहीतरी घडणार असं वाटतंय
तुझ्या माझ्या प्रेमाआड काहीतरी येणार असं दिसतंय
निसर्ग काही इशारा देतोय, काहीतरी सांगावा धाडतोय,
या जलधारा, ही हवा, हा पाऊस प्रीतीचा डाव का उधळून लावतोय !

या सर्वांचं काय म्हणणं, ते काहीतरी गुपित असंणं   
त्यांचं काही नाही म्हणणं, आपल्या खामोशीतून इशारा देणं
तुझ्या आणि माझ्या प्रीतीत आलेल्या विरहाबद्दल त्यांचं चुप्प राहून बोलणं,
मूक गर्भित इशाऱ्यामधून प्रेमात पडलेलं अंतर गप्प सांगणं

त्यांचा रोख कुणावर आहे, हे इथवर कळून चुकलंय
प्रीतीत आलेला विरह, ही दूरी नुसतं पाहून कळलंय 
सांगताहेत, हे अंतर कमी करा, एकमेकांना जवळ करा,
वाटतंय, पडतI पडतI, वाहतI वाहतI त्यांनी खूप काही पाहिलंय 

वाऱ्याने एक सांगावा धाडलाय, वाहतI वाहतI
पाऊस काहीतरी सूचित करतोय, जलधारा बरसवता 
तुमच्या प्रेमाचे गणित चुकतंय, तुमचे पाऊल अडखळतंय,
सारंच समीकरण जुळतI जुळतI, कुठेतरी ते वजा होतंय

हा पाऊस साधा नाहीय, खुफियाच आहे तो
पडतI पडतI नेहमीच काहीतरी गुज सांगत असतो तो
पडतI पडतI साऱ्यांवरच गुप्त नजर ठेवतो तो,
हे अंतर मिटवा, ही दूरी दूर करा, प्रीत जुळवा, बोलत असतो तो

या साऱ्यांनी प्रेमाचे गणित आज उलगडून समोर ठेवलेय
आपल्या मूक इशाऱ्यातून त्यांनी ते आपणास सांगितलेय
प्रेमात अंतर पडलेल्या दोघांना ते जणू एक करू पाहताहेत,
आपल्या नि:शब्द बोलण्यातून ते उघडपणे प्रीत जुळवू पाहताहेत

त्यांचा इशारा ओळख प्रिया, याचा गर्भितार्थ समजून घे
ही दूरी मिटवून टाक, प्रेम आहे आपले पाक, मला जवळ घे
प्रेमात खूपच पडलंय अंतर आपल्या, साऱ्याचा नंतर विचार कर,
हे अंतर, ही तफावत वाढू देऊ नकोस, या साऱ्याचे एकच उत्तर

माझे ओठ काही सांगताहेत, त्यांचं म्हणणं तू नीट ऐक
त्यांचा आहे तुजकडे प्रेमाचा आर्जव, ठोकरु नकोस शब्द प्रत्येक
श्वासात माझ्या भरलाय तुझ्याच नावाचा, तुझ्याच प्रेमाचा सुगंध,
हा गंधित गंध खोटा म्हणू नकोस, नकोस लावू त्याला तू निर्बंध 

तुझा एकचं स्पर्श, माझा रोम रोम पुलकित करेल
तुझा एकचं स्पर्श, माझ्या मनातली प्रीत वर्धित करेल
तुझा एकचं स्पर्श, माझी तगमग, तळमळ शांत करेल,
तुझा एकचं स्पर्श मला हवाय, एकाच स्पर्शाने तुझी प्रीत कळेल 

अश्या का बरसताहेत जलधारा, पाऊस कोणता देतोय इशारा ?
     आज अश्याच बरसताहेत धारा, पावसाचा समजून जा इशारा
     तुझ्या प्रीतीचा मला हवाय आधार, तू प्रेमाचा दे मज सहारा,
     बघ ते सारे पाहताहेत आपलं प्रेम, त्यांचा आहे आपल्यावरती पहारा

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.09.2023-शनिवार.
=========================================