II श्री गणेशाय नमः II-संकष्टी चतुर्थी-माहिती

Started by Atul Kaviraje, September 03, 2023, 11:34:03 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II श्री गणेशाय नमः II
                                    "संकष्टी चतुर्थी"
                               --------------------
मित्र/मैत्रिणींनो,

     आज  दिनांक-03.09.2023-रविवार, संकष्टी चतुर्थीचा पावन दिन आहे . श्री गणेश चरणी वंदन करून, वाचूया श्री गणेश संकष्टी चतुर्थीवर महत्त्वाची माहिती.

     सप्टेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी रविवार 3 सप्टेंबर 2023 रोजी आहे. पंचांगानुसार, चतुर्थी तिथी 02 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 08 वाजून 49 मिनिटांनी प्रारंभ होईल. तर दुसऱ्या दिवशी 03 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 06 वाजून 24 मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत 3 सप्टेंबर रोजी केले जाईल.

     सप्टेंबर महिन्यात कधी आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी--

     Sankashti Chaturthi 2023: हिंदू धर्मात भगवान गणेशजींना विशेष महत्त्व आहे. धार्मिक ग्रंथानुसार, गणपतीला प्रथम पूजनीय देव मानले जाते. गणेश पूजनाशिवाय कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात होत नाही. गणेश पूजनाने शुभ कार्यातील विघ्न दूर होतात अशी मान्यता आहे. अशा या विघ्नहर्ता गणपतीला संकष्टी चतुर्थी समर्पित असून या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केली जाते. या दिवशी व्रत केल्याने भाविकांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात.

     सनातन हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते. संकष्टी चतुर्थी भगवान गणेशजींना समर्पित आहे. गणेश पुराणानुसार संकष्टी चतुर्थीला विधिवत पूजन आणि व्रत केल्याने भगवान गणपती लवकर प्रसन्न होतात. या व्रताच्या प्रभावाने भक्तांचा सर्व मनोकामना पूर्ण होतात. सध्या श्रावण मास सुरु असून श्रावणात येणारी संकष्टी चतुर्थी विशेष आहे. त्यानुसार जाणून घेऊया सप्टेंबर महिन्यात संकष्टी चतुर्थी कधी आहे.

            हे आहे संकष्टी चतुर्थीचे महत्त्व--

     हिंदू धर्मात भगवान गणेशजींना विशेष महत्त्व आहे. धार्मिक ग्रंथानुसार, गणपतीला प्रथम पूजनीय देव मानले जाते. गणेश पूजनाशिवाय कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात होत नाही. प्रत्येक शुभ कार्याच्या आधी गणेश पूजन केले जाते. गणेश पूजनाने शुभ कार्यातील विघ्न दूर होतात अशी मान्यता आहे. अशा या विघ्नहर्ता गणपतीला संकष्टी चतुर्थी समर्पित असून या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केली जाते. सर्व व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी व्रत केल्याने भाविकांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. तसेच गणपतीच्या कृपेने सकारात्मक फळ प्राप्त होत भक्तांच्या सर्व मनोकामना पुर्ण होतात अशी धार्मिक मान्यता आहे.

             तिथी आणि शुभ वेळ--

     सप्टेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी रविवार 3 सप्टेंबर 2023 रोजी आहे. पंचांगानुसार, चतुर्थी तिथी 02 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 08 वाजून 49 मिनिटांनी प्रारंभ होईल. तर दुसऱ्या दिवशी 03 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 06 वाजून 24 मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत 3 सप्टेंबर रोजी केले जाईल. या दिवशी बुद्धी आणि ज्ञानाचे दैवत गणपतीची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात.

            गणेश पूजेची वेळ--

     सकाळी 07 वाजून 35 मिनिटांपासून ते सकाळी 10 वाजून 45 मिनिटांपर्यंत. तर सायंकाळी 06 वाजून 41 मिनिटांपासून ते रात्री 09 वाजून 31 मिनिटांपर्यंत. मान्यतेनुसार, रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यावर हे व्रत सोडण्याची प्रथा आहे. त्यानुसार या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 08 वाजून 57 मिनिटांनी आहे.

             अशी करा पूजा--

     संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम श्रीगणेशाचे ध्यान करून नमस्कार करा. यानंतर, घर स्वच्छ करत स्नान करावे. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करुन सुर्यदेवाला जल अर्घ्य द्या. यानंतर गणेश मंत्राचा जप करत गणपतीचे आवाहन करा.

     फळे, फुले, अगरबत्ती, दुर्वा, चंदन इत्यादींनी गणपतीच्या विधिवत पूजनाला सुरुवात करा. गणपतीला पिवळ्या फुले खूप आवडतात. त्यामुळे पूजेच्या वेळी त्यांना पिवळी फुले, दुर्वा अर्पण करा. पूजेदरम्यान, गणेश चालीसा आणि गणेश मंत्रांचा जप करा. शेवटी आरती करून श्रीगणेशाला सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करा.

             मोदक अर्पण करा--

     भगवान गणपतीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत करत असाल तर फक्त दुधाचा आहार घ्या. तसेच गणपतीच्या मंदिरात विधिवत पूजन करत देवाला मोदक अर्पण करावा. भगवान गणपतीला मोदक खूप प्रिय आहे. मोदक अर्पण केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

--Edited by: Vikas Chavan
------------------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-टाईम्स नाऊ मराठी.कॉम)
                  ------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.09.2023-रविवार. 
=========================================