पावसातली विरह कविता-गीत-येऊन भेट तू मला सावरिया, आठवणीत तुझ्या मी लागलेय झुराया

Started by Atul Kaviraje, September 04, 2023, 10:30:46 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसातली एक विरह कविता-गीत ऐकवितो. "आजा सांवरिया आ आ आ आ, ताल से ताल मिला"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही प्रसन्न अशी पावसाने रजा घेतलेली, सोमवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( आजा सांवरिया आ आ आ आ, ताल से ताल मिला )           
-------------------------------------------------------------

            "येऊन भेट तू मला सावरिया, आठवणीत तुझ्या मी लागलेय झुराया"
           ----------------------------------------------------------

येऊन भेट तू मला सावरिया
आठवणीत तुझ्या मी लागलेय झुराया
किती दिसIत नाही तुझी भेट, नाही गाठ,
मन होतंय उदास, वाढत चालल्या बेचैनीयI

येऊन भेट तू मला सावरिया
आठवणीत तुझ्या मी लागलेय झुराया
तुझ्या वाटेकडे डोळे लागलेत माझे,
तुझ्या विरहात ते लागतील आता पIझरIया

तुझ्या जुदाईत माझे जीवन बेहाल होतंय
या एकलेपणाच दुःखच माझ्या पदरी पडतंय
तुझा हा विरह माझ्या मनाला सलतोय काट्यासारखा,
मनIस नाही थारा माझ्या, हे अंतर आपल्यात का पडतंय ?

जीवनात माझ्या काहीच रस उरला नाही
जणू निरस, सपक, अर्थहीन असंच होई
जीवनरस वाटतंय कुणीतरी शोषूनच घेतलाय,
अस्थिमांसाचा फक्त भावनाहीन गोळाच माझा झालाय

जीवनात ना सूर, ना लय, ना ताल, काहीच नाही उरलंय
जीवनाचे गाणे माझ्या बेसूर, बेताल, बेमतलबी होत चाललंय
साज जणू हरवलाय, गIज लुप्त झालाय, आगाज नाहीच, अंत झालाय,
जिथे गाणंच माझं हरवलंय, तिथे मैफिलीचं काय काम उरलंय ?

येऊन भेट तू मला सावरिया
आठवणीत तुझ्या मी लागलेय झुराया
काल परवापर्यंत माझी प्रीत होतास तू,
आज तू मला का वाटू लागलास पराया ?

येऊन भेट तू मला सावरिया
आठवणीत तुझ्या मी लागलेय झुराया
माझ्या सुरIत तू सूर मिळवं, लय साध,
ताल तुझ्या माझ्याबरोबर आज लागलाय बिघडIया

श्रावण आलाय, सोबत पाऊस घेऊन बरसलाय 
मंद, शीतल थेम्ब पावसाचा अंगावर बरसू लागलाय
चिंब करीत, पूर्ण भिजवीत मजला श्रIवण जणू हसतोय,
माझ्या चेहऱ्यावरचे हास्यचं मावळलंय, मन तरसू लागलेय

मी माझ्याच विचारात भिजत, थिजत उभी आहे या जलधारांत
मी काय मिळवले, मी काय हरवले, विमनस्क आहे मी याच विचारात
मलाच मी विचारतेय, मलाच प्रश्न करतेय, अंतर्मनाला खोल स्वरात,
याचे उत्तरच मला नाही सापडत, निज नाही मज शांत अहोरात 

तू येशील, मला जवळ घेशील, माझ्या सूरIत सूर मिळवशील
तू गप्प का, तू खामोश का, मी तुला इतकी पराई झालेय का ?
आज तुझा ताल चुकतोय, आज तुझी चालही चुकतेय,
बेताल, बेसूर, भासू लागलय मला हे जीवन, तू इतका दूर का ?

येऊन भेट तू मला सावरिया
आठवणीत तुझ्या मी लागलेय झुराया
ये माझ्या पावलावर पाऊल ठेव,
हातात हात घालून आपण कुठेतरी दूर जाऊया

येऊन भेट तू मला सावरिया
आठवणीत तुझ्या मी लागलेय झुराया
या पावसासही कळलंय माझे दुःख,
का झालास आज तू मला पराया ?

असं वाटतंय आपण एकमेकांना अजाण आहोत, अनोळखी आहोत
तू तिथे, अन मी तिथे, दोघेही दोन किनाऱ्यावर लांब उभे आहोत
समुद्र खवळलाय, भरती आलीय, लाटा उसळताहेत , प्रवाह बदलतोय,
तुझ्या माझ्या प्रेमाची हीच का परिणती, विरहात खोल खोल बुडत आहोत

मी तुला पुन्हा जाणून घेईन, तूही मला नीट पाहून घे
आपली हरवलेली प्रीत, साजणा, मला तू पुन्हा आणून दे
आपण आपलं गमावलेलं प्रेम परत मिळवूयI, आपण पुन्हा भेटूया,
मला आणखी काहीही नकोय, फक्त तुझं प्रेमचं हवय, सावरिया

थोडं समजून घे मला, थोडं जाणून घे माझ्या दुःखाला
समजाव तुझ्या मनाला, मनाचे दुःख फक्त कळतंय मनाला
तुझ्या मनाचे तू ऐक, या विरहाने खूप वेदना दिल्यात मला,
आपल्या प्रेमाचा खरा मार्ग तू स्वीकार, असा नको टाकूस तू एकटं मला

येऊन भेट तू मला सावरिया
आठवणीत तुझ्या मी लागलेय झुराया
माझे आणि तुझे एकच हाल आहेत,
चल या परिस्थितीशी आपण जुळवून घेऊया

येऊन भेट तू मला सावरिया
आठवणीत तुझ्या मी लागलेय झुराया
झाले गेले सारे विसरून जाऊया,
पुन्हा एकदा आपले नवे आयुष्य सुरु करूया

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.09.2023-सोमवार.
=========================================