०४-सप्टेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, September 04, 2023, 04:57:10 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०४.०९.२०२३-सोमवार.जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिनविशेष"

                                 "०४-सप्टेंबर-दिनविशेष"
                                ----------------------

-: दिनविशेष :-
०४ सप्टेंबर
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२०१३
रघुराम राजन यांनी 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'चे २३ वे गव्हर्नर म्हणुन पदभार हाती घेतला.
२००१
Hewlett Packard या कंपनीने संगणक क्षेत्रातील Compaq Corporation ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली.
१९९८
स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी 'गुगल'ची स्थापना केली.
१९७२
मार्क स्पिटझ
मार्क स्पिटझ (जलतरण) हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला. जर्मनीतील म्युनिच येथे झालेल्या २० व्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्याने ही कामगिरी केली.
१९३७
संत तुकाराम
व्हेनिसमधील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'प्रभात'च्या 'संत तुकाराम' या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली. इतर दोन चित्रपट होते ऑस्ट्रेलियाचा 'फ्लाइंग डॉक्टर' आणि हंगेरीचा 'मारिया नोव्हेर'.
१९०९
बालवीर (Scout) चळवळीचा पहिला मेळावा झाला. लॉर्ड बेडन पॉवेल यांनी सुरू केलेली ही चळवळ थोड्याच काळात जगभर पसरुन लोकप्रिय झाली.
१८८८
जॉर्ज इस्टमन याने 'कोडॅक' हा ट्रेडमार्क नोंदवला व फिल्म कॅमेर्‍याचे पेटंट घेतले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९७१
लान्स क्लूसनर
लान्स क्लूसनर – दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू
१९६२
किरण मोरे
किरण मोरे – यष्टीरक्षक
१९५२
ऋषी कपूर
बॉबी (१९७३) या चित्रपटात
ऋषी कपूर – अभिनेता, दिग्दर्शक व चित्रपट निर्माता
(मृत्यू: ३० एप्रिल २०२०)
१९४१
सुशीलकुमार संभाजीराव शिंदे
सुशीलकुमार संभाजीराव शिंदे – केंद्रीय गृहमंत्री, ऊर्जा मंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (कार्यकाल: १८ जानेवारी २००३ ते ३० ऑक्टोबर २००४)
१९३७
शंकर सारडा
शंकर सारडा – साहित्यिक व समीक्षक. सारडा यांनी ६० हून अधिक पुस्तकं लिहिली असून, दोन हजांराहून अधिक पुस्तकांचं समीक्षण केलं आहे.
(मृत्यू: २८ जानेवारी २०२१)
१९१३
पी. एन. हक्सर
परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर – कुशल प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे (पहिले) मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष
(मृत्यू: २५ नोव्हेंबर १९९८)
१८२५
दादाभाई नौरोजी
१९६३ मध्ये जरी केलेले टपाल तिकीट
पितामह दादाभाई नौरोजी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि राजकीय व सामाजिक नेते, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय
(मृत्यू: ३० जून १९१७)
१२२१
श्री चक्रधर स्वामी – महानुभाव पंथाचे संस्थापक
(मृत्यू: ७ फेब्रुवारी १२७४)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०००
मुक्री
मोहम्मद उमर 'मुक्री' – आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते
(जन्म: ५ जानेवारी १९२२)
१९९७
डॉ. धर्मवीर भारती – हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व 'धर्मयुग' साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक, 'अभ्युदय' व 'संगम' या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले.
(जन्म: २५ डिसेंबर १९२६)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.09.2023-सोमवार.
=========================================