विरह गीत-कविता-तुझ्या मिठीत सर्वकाही विसरते मी, डोळे देतात तुझ्या प्रेमाची हमी

Started by Atul Kaviraje, September 05, 2023, 10:48:31 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसातली एक विरह कविता-गीत ऐकवितो. "आ रहा हैं मज़ा तेरी बाहों में, छा रहा हैं नशा मेरी निगाहों में"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही निरभ्र, छान सोनेरी चमकदार ऊन पडलेली                   मंगळवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( आ रहा हैं मज़ा तेरी बाहों में, छा रहा हैं नशा मेरी निगाहों में )           
----------------------------------------------------------------------

            "तुझ्या मिठीत सर्वकाही विसरते मी, डोळे देतात तुझ्या प्रेमाची हमी"
           ----------------------------------------------------------

तुझ्या मिठीत सर्वकाही विसरते मी
डोळे देतात तुझ्या प्रेमाची हमी
तुझ्या बाहूंच्या घेऱ्यात मी सुरक्षित असते,
खूप काही देतात ते, काहीही नसते कमी

तुझ्या मिठीत सर्वकाही विसरते मी
डोळे देतात तुझ्या प्रेमाची हमी
असाच जवळ घेऊन तू नित्य माझ्यावर प्रेम कर,
आहे ना मला सुचलेली शक्कल नामी

तुझ्या मिठीत सर्वकाही विसरते मी
डोळे देतात तुझ्या प्रेमाची हमी
तुझ्या डोळ्यांत जणू नशाच भरलीय,
हरवूनच जाते, माझीच रहIत नाही मी

तुझ्या मिठीत सर्वकाही विसरते मी
डोळे देतात तुझ्या प्रेमाची हमी
तुझे डोळे बोलके आहेत, ते काही सांगतात,
माझ्या मनात उमलून येतात प्रेमाच्या उर्मी

तू मला कवेत घेता, ती मजा काही औरच असते
तुझ्या नजरेत प्रेम दिसतI, वेगळी खुमारी येत असते
काय नाही साजणा तुझ्यात, मर्दानी सौंदर्याचा पुतळाच तू,
नकळत ओढतय माझं मन तुजकडे, ते सावरता सावरत नसते

सर्व सर्व विशेषणांनी तू युक्त आहेस, तू सर्व गुणांनी व्याप्त आहेस
तुझ्या प्रेमात पागल झालेली मी, तुझ्यावर कधीची आसक्त आहे
तुझा एकच भावुक स्पर्श मला मोहरून टाकतो, अंग अंग चेतवितो,
तुझे उत्कट चुंबन, माझ्या गIलवारला रक्तिमा वाढवून जातो

तू माझे आयुष्य आहेस, तूच माझे जीवन आहे
तूच माझी अIशा आहेस, तूच माझी आकांक्षा आहेस
तू असता मी अपूर्ण राहत नाही, माझ्या साऱ्या आरजू पूर्ण होतात,
मला तू असाच संपूर्ण हवास, माझ्या प्रेमासाठी तू परिपूर्ण आहेस

आता ऐकशील का माझं जरा, पाहशील का एकवार मजला
कधीची हाक मारतेय मी, तू साद का देत नाहीस मग मजला
मुद्दामून दुर्लक्ष नको करुस, माझी हाक अनसुनी नको करुस,
ही तुझी अभिसारिका तुझ्यावर प्रेम करतेय मनापासून, दाद ते तिजला

तुझ्या मिठीत सर्वकाही विसरते मी
डोळे देतात तुझ्या प्रेमाची हमी
तुझ्या प्रेमासाठी मी काहीही करीन, सख्या,
पत्करेनही मी तुझ्यासाठी तुझी गुलामी

तुझ्या मिठीत सर्वकाही विसरते मी
डोळे देतात तुझ्या प्रेमाची हमी
दूर नको राहूस, शपथ आहे तुला प्रेमाची,
मला नाही वाटतं तू असशील एवढा जुलमी

तुझं नसणं तडपवतय मला, दुःख देतंय माझ्या मनाला
अंग अंग फणफ़णतय ज्वराग्नीने, तप्त चटके बसताहेत देहाला
हे दुःख मी सांगू कुणाला, साऱ्या तनुला विळखा घातलाय नागिणीसम यI दर्दने,
शरीर पेटलंय, वाफI निघताहेत फुत्कारासम, कसं शांत करू या तनाला ?

कुठे जलन आहे, तर कुठे चूभन आहे, सारं असह्यच होतंय मला
देहात तपन आहे, मनात अगन आहे, काहीही सहन होत नाहीय मला
माझा श्वIसनश्वास फुललाय तुझ्या आठवणीने, प्रत्येक श्वासात अंगारा भरलाय,
हृदयातील धडधड वाढलीय, तेज झालीय, तुझ्या फक्त एकच स्पर्श शांत करील तिला

का तू माझी अशी केलीस दैना, तुला का चैन येतेय ?
का असा माझा केलास तू हाल, तुला का सुकून मिळतोय ?
असा मला तडपवू नकोस, मला तू असा तरसवू नकोस,
मला या एकलेपणाची शिक्षा देऊ नकोस, माझा जणू जीवचं निघून जातोय !

माझं मन बेचैन झालंय तुझ्याविना, मला काहीच नाही समजत
मनIने ओढलंय उदासीचं पांघरूण, मनाला काहीच नाही सुचत
तू ये, माझी बेचैनी दूर कर, मला जवळ घे, माझी परेशानी दूर कर,
तू नाहीस, तर जीवनाला अर्थच नाही, मला आज अन्नही गोड नाही लागत 

तुझ्या मिठीत सर्वकाही विसरते मी
डोळे देतात तुझ्या प्रेमाची हमी
साजणा वाट पाहतेय, कधी येशील ?,
आता का आवडेनाशी झालेय तुला मी

तुझ्या मिठीत सर्वकाही विसरते मी
डोळे देतात तुझ्या प्रेमाची हमी
तुझ्या विरहात निज नाहीय डोळ्यात,
अर्धी रात्र सरलीय, सरत नाहीय उरलेली निम्मी

तूही जवान आहेस, मीही तरुण आहे, पण परिस्थिती दारुण आहे
हा समाही उफाणत आहे, हा अIसमIही उधाणत आहे, मी हे सारं जाणून आहे 
तुझ्या जुदाईने एकटे केलंय मला, नैराश्येने मन घेरले आहे, मी उदास आहे,
तुझ्याविना जीवन नाही, आयुष्य निरस आहे, सारेच विराण, भकास आहे

तुला पाहण्याची माझी प्यास वाढत चालली आहे, मी तृषार्त आहे
तुला मिळवण्याची माझी अIसं वाढत चालली आहे, मी अतृप्त आहे
ही तहान तूच मिटवू शकतोस, मला तूच प्रेम-जल पाजू शकतोस,
मला तृप्त तूच करू शकतोस, माझ्या सुप्त इच्छांची पूर्तता करू शकतोस

तू इतका का खुदगर्ज आहेस, इतका का तू मतलबी आहेस ?
की तुझं मन तुझ्या काबूत नाही, इतका का तू बेबस आहेस ?
माझी तगमग, माझं तडपणं, माझं तरसणं तू पहIत नाहीस का ?,
या तुझ्या अभिसारिकेला तू तुझं प्रेम देऊ शकत नाहीस का ?

हा विरह, ही ताटातूट, ही फारकत आता मला असह्य होत चाललीय
तुझ्या विरहातली ही जुदाई, मला काळोख्या तनहाईत घेऊन चाललीय
हे प्रेम असंच असतं का, विरहात ते तनाला मनाला जाचत राहत का ?,
आपलं प्रेम पुन्हा जुळIवं, आपण एकत्र यावं, असं कधी वाटत नाही का ?

तुझ्या मिठीत सर्वकाही विसरते मी
डोळे देतात तुझ्या प्रेमाची हमी
मला भेट, कायम तू माझ्याजवळ राहा,
आपण दोघे होऊन राहू एकमेकांचे प्रेमी

तुझ्या मिठीत सर्वकाही विसरते मी
डोळे देतात तुझ्या प्रेमाची हमी
आता बोलण्यासारखे काही नाही उरलंय,
तुझी उणीव जाणवतेय, तुझीच भासतेय कमी

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.09.2023-मंगळवार.
=========================================