०६-सप्टेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 05:02:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार.जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                 "०६-सप्टेंबर-दिनविशेष"
                                ----------------------

-: दिनविशेष :-
०६ सप्टेंबर
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९७
अमेरिकेतील 'नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस' या संस्थेतर्फे विख्यात सरोदवादक अमजद अली खाँ यांची 'नॅशनल हेरिटेज फेलोशिप'साठी निवड
१९६८
स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.
१९६६
दक्षिण अफ्रिकेचे पंतप्रधान हेन्ड्रिक व्हरवोअर्ड यांची संसदीय बैठक चालू असतानाच भोसकुन हत्या.
१९६५
पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल अयुब खान यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारले. 'ऑपरेशन ग्रँड स्लॅम' ही त्यांची दिल्लीपर्यंत धडक मारण्याची योजना होती. पॅटन रणगाडे आणि सेबरजेट विमाने असलेल्या पाकिस्तानच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानवर हल्ला चढवला व पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरूवात झाली. या युद्धात भारताने पाकिस्तानला सपाटून मार दिला.
१९५२
कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केन्द्र माँट्रिअल येथे सुरू झाले.
१९३९
दुसरे महायुद्ध – दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९६८
सईद अन्वर
सईद अन्वर – पाकिस्तानी डावखुरा फलंदाज व कप्तान. आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात तो दोन्ही डावांत शून्य धावांवर बाद झाला होता. आपल्या पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातही त्याने केवळ ३ धावा केल्या होत्या. मात्र नंतर त्याची कामगिरी एकदमच बहारदार झाली. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत सलग तीन शतके झळकावणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होतो.
१९२९
यश जोहर
यश जोहर – हिन्दी चित्रपट निर्माता
(मृत्यू: २६ जून २००४)
१९०१
कमलाबाई गोखले
कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार. 'राजा हरिश्चंद्र' या पहिल्या मूकपटात त्यांनी भूमिका केली होती. त्यांचे चिरंजीव चंद्रकांत गोखले व नातू विक्रम गोखले अशा तीन पिढ्यांनी अभिनय क्षेत्र गाजवले.
(मृत्यू: १८ मे १९९७)
१८८९
बॅ. शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू
(मृत्यू: २० फेब्रुवारी १९५०)
१७६६
जॉन डाल्टन
जॉन डाल्टन – इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ
(मृत्यू: २७ जुलै १८४४)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
१९९०
लेन हटन
सर लिओनार्ड तथा 'लेन' हटन – इंग्लिश क्रिकेटपटू
(जन्म: २३ जून १९१६)
१९८६
सुरेश हरिप्रसाद जोशी – आधुनिक गुजराथीतील प्रसिद्ध कवी, कथाकार व समीक्षक. त्यांनी काही भारतीय व परकीय साहित्यकृतींचे गुजराथीत अनुवादही केले.
(जन्म: ३० मे १९२१)
१९७२
उस्ताद अल्लाउद्दीन खाँ
१९९९ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट
उस्ताद अल्लाउद्दीन खाँ – सरोदवादक व संगीतकार. हिन्दुस्थानी शास्त्रीय संगीतातील महर्षितुल्य कलाकार व संगीतकार. सरोद, व्हायोलिन, बासरी व अन्य अनेक वाद्ये ते तयारीने वाजवत असत. मैहर राजघराण्याचे दरबारी वादक. संगीत नाटक अकादमी पारितोषिक (१९५४), पद्मभूषण (१९५८), पद्मविभूषण (१९७१) इ. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
(जन्म: ? ? १८६२)
१९६३
राष्ट्रकवी गोविंद पै
मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै – कन्‍नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक, इतिहास व तत्त्वज्ञानाचे व्यासंगी, त्यांना कन्‍नड, कोंकणी, इंग्लिश, तुळू, संस्कृत, तेलुगू, तामिळ, मराठी, बंगाली, पर्शियन, पाली, ऊर्दू, ग्रीक, जपानी इ. २५ भाषा अस्खलित येत असत. त्यांनी अनेक जपानी ग्रंथांचे कन्‍नडमध्ये भाषांतर केले.
(जन्म: २३ मार्च १८८३)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार.
=========================================