श्रीकृष्ण जयंती-निबंध-2

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 05:09:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "श्रीकृष्ण जयंती"
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया कृष्ण जन्माष्टमी वर निबंध.

                 श्री कृष्णाचा जन्म--

     श्री कृष्णाचा जन्म १२ वाजता त्याचा मामा कंसाच्या तुरूंगात झाला. त्याच्या वडिलांचे नाव वासुदेव आणि आईचे नाव वास देवकी आहे. कृष्णा जन्माष्टमीच्या दिवशी लोक उपवास ठेवतात आणि मध्यरात्री 12 वाजता कृष्णाच्या जन्मानंतर श्री कृष्णाची आरती केली जाते. यानंतर, लोक त्यांच्या नातेवाईक आणि शेजाऱ्यांसोबत उपवास सोडतात.

              आख्यायिका--

     देवकी हि कंसाची बहीण होती आणि कंस हे मथुरेचा राजा होता. त्याने मथुरेचा राजा आणि त्याचे वडील अगरसेन यांना तुरूंगात टाकले आणि तो स्वतः राजा झाला. कंसाचे देवकीवर खूप प्रेम होते. त्याने तिचे लग्न आपला मित्र वसुदेव यांच्याशी लावून दिले.

     कंस खूप जुलमी होता. एकदा देवकीच्या लग्नानंतर एक आकाशवाणी झाली कि तू ज्या बहिणीवर प्रेम करतोस त्या आठव्या मुलामुळे तुमचा मृत्यू होईल.

     हे ऐकताच कंसाने आपल्या बहिणीला आणि तिच्या नवऱ्याला तुरुंगात बंद केले. देवकीला आधी झालेली सात मुले कंसाने जमिनीवर आपसून त्यांना ठार मारले. देवकीचा आठवा मुलगा जन्माला आला तेव्हा तुरूंगातील सर्व रक्षक झोपले होते. पिता वसुदेव याने आपल्या मुलाला घेतले आणि आपल्या मित्राकडे नंदाच्या घरी नेऊन ठेवले आणि नंदाला झालेली मुलगी घेऊन परत आले.

     सकाळ झाली तेव्हा वासुदेवने ती मुलगी कंसाच्या स्वाधीन केली. कंसाने तिला मारण्यासाठी दगडावर आपटायला नेताच ती आकाशात गेली आणि म्हणाली की ती तुला मारण्यासाठी कृष्ण अजून जिवंत आहे आणि गोकुळात एकदम सुखरूप आहे. हे सांगून ती मुलगी निघून गेली.

     यानंतर कंसाने कृष्णाला ठार मारण्याचा खूप वेळा प्रयत्न केला. त्याने पुतना, वाकासुर सारख्या अनेक राक्षसांना कृष्णाला मारण्यासाठी पाठवले पण कृष्णाला कोणी मारू शकले नाही. श्री कृष्णाने त्या सर्वांना ठार मारले होते.

            कृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व--

     विवाहित जीवन सुरू होताच प्रत्येक जोडप्याची इच्छा आहे की त्यांना एक चांगले मूळ व्हावे. सर्व जोडप्यांना हा आशीर्वाद मिळावा, यासाठी या दिवशी सर्व विवाहित महिलांना या दिवशी पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने पूजा करायला सांगतात आणि त्याची पुत्र प्राप्तीची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तिच्या ओटीत कृष्णाची मूर्ती देतात.

     या दिवशी लोक कृष्णाच्या मंदिरात जातात आणि प्रसाद, फूल, फळ, चंदन अर्पण करतात.

     देव जन्माला आल्यानंतर भक्ती आणि पारंपारिक गाणी गायली जातात. लोकांचा असा विश्वास आहे कि जर आपण पूर्ण भक्ती आणि विश्वासाने प्रार्थना केली तर भगवान श्री कृष्ण आपली सर्व पापे व दु:ख दूर करतील आणि मानवतेचे रक्षण करतील.

--by Marathi Social
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी सोशल.कॉम)
                    --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================