श्रीकृष्ण जयंती-लेख-3

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 05:13:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                     "श्रीकृष्ण जयंती"
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया एक महत्त्वाचा लेख.

           गोकुळाष्टमी संपूर्ण माहिती : Shri Krishna Janmashtami Information--

          प्रस्तावना (Introduction Of Shri Krishna Jayanti)

     गोविंद, बाळ गोपाळ, कान्हा, कन्हैया, गोपाळ, केशव, कृष्ण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचा जन्म, हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमीला, रोहिणी नक्षत्रावर, मथुरेमध्ये कंसाच्या बंदी शाळेत झाला होता. या दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी म्हणून आपण हा श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो. या सणाचा इतिहास, या सणाचे महत्त्व, हा सण आपण का साजरा करतो? याबाबतची सगळी माहिती आज आम्ही या लेखाद्वारे घेऊन आलो आहोत. चल तर मग, जाणून घेऊया श्रीकृष्ण जयंती.

     आपला भारत देश हा धार्मिक परंपरांचा देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आपल्या देशामध्ये सगळे सण मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरे केले जातात. त्यापैकी एक म्हणजे श्रीकृष्ण जयंती, म्हणजेच गोकुळाष्टमी.

            इतिहास (History Of Gokulashtami)--

     श्रावण कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री भाऊ कंसाचा अत्याचार सहन करणारी त्याची बहीण देवकी हिने, आठवे अपत्य म्हणून भगवान श्रीकृष्णाला जन्म दिला. पृथ्वीला कंसाच्या अत्याचारापासून आणि दहशती पासून मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी अवतार घेतला होता. या आख्यायिकेनुसार दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा केला जातो.

=========================================
धार्मिकदृष्ट्या (Shri Krishna Jayanthi 2023 Information)--
सणाचे नाव –गोकुळाष्टमी
स्थान –भगवान कृष्ण
सणाचे दुसरे नाव –श्रीकृष्ण जयंती, श्रीकृष्ण जन्माष्टमी
मराठी महिना –श्रावण
इंग्रजी महिना –ऑगस्ट/सप्टेंबर
कधी साजरा करतात –श्रावण कृष्ण अष्टमी
यावर्षी कधी आहे –६ सप्टेंबर २०२३
=========================================

--by Team MarathiZatka
----------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीझटका.कॉम)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================