श्रीकृष्ण जयंती-लेख-4

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 05:15:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "श्रीकृष्ण जयंती"
                                     ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया एक महत्त्वाचा लेख.

       श्री कृष्ण जयंती / गोकुळाष्टमी माहिती (Gokulashtami Information)--

     हिंदू धर्मातील महत्वपूर्ण सणांपैकी एक म्हणून हा दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. या दिवशी भगवान कृष्णाच्या भक्तीसाठी लोक उपवास करतात. आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी भगवान कृष्ण ला प्रार्थना करतात. कृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्यामुळे रात्री कृष्णाच्या मूर्तीला पाळण्यात घातले जाते. त्यानंतर कृष्णाची गाणी, पाळणे म्हणून पाळण्याला झोका दिला जातो. पूजा अर्चा करून प्रार्थना केली जाते.

     ज्या ज्या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो त्या त्या ठिकाणी फुलांची, दिव्यांची आरास केली जाते. कृष्णाला आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवून प्रसाद वाटप केले जाते. नाच गाण्यांनी संपूर्ण रात्र जागवली जाते. दुसऱ्या दिवशी पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवला जातो. ठिकठिकाणी वेगवेगळे खेळ खेळले जातात. त्यानंतर काला करून कृष्णाला नैवेद्य दाखवून सगळ्यांना प्रसाद वाटप करून नंतर कृष्णाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.

            श्रीकृष्ण जयंती अर्थ(Meaning Of Gokulashtami)--

     श्रावण कृष्णपक्ष अष्टमीला भगवान कृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून हा सण श्रीकृष्ण जयंती म्हणून साजरा केला जातो. भगवान कृष्णाचा जन्म ज्या दिवशी झाला ती जयंती म्हणजेच "श्रीकृष्ण जयंती". या सणाला गोकुळाष्टमी, जन्माष्टमी अशी देखील नावे आहेत. गोकुळामध्ये गाईंचे पालन करणाऱ्या कृष्णाचा जन्म अष्टमीला झाला होता. म्हणून या सणाला "गोकुळाष्टमी" असे देखील म्हटले जाते. श्रावण कृष्ण अष्टमीला भगवान कृष्णांचा जन्म झाला होता. म्हणून हा सण "जन्माष्टमी" म्हणून साजरा करतात.

            गोकुळाष्टमी चे महत्व (Gokulashtami Information)--

     श्रावण कृष्ण अष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून त्याचा आनंद साजरा करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी व्रतवैकल्य केले केले जाते. ज्या ठिकाणी कृष्णाची पूजा केली जाते, ते ठिकाण फुलांनी तसेच दिव्यांनी सुशोभित केले जाते. त्यानंतर कृष्णाच्या मूर्तीची स्थापना केली जाते. त्याच्याच बाजूला वसुदेव आणि देवकी यांच्या देखील मूर्ती बसवल्या जातात. अष्टमीच्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवला जातो. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

     भगवान विष्णू कृष्णाच्या रूपामध्ये सृष्टीच्या कल्याणासाठी तसे धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि या पृथ्वीला पापांपासून मुक्त करण्यासाठी देवकीच्या पोटी जन्म घेऊन आपला आठवा अवतार धारण केला.

--by Team MarathiZatka
----------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीझटका.कॉम)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================