श्रीकृष्ण जयंती-लेख-5

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 05:16:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "श्रीकृष्ण जयंती"
                                     ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया एक महत्त्वाचा लेख.

           कृष्ण जन्माष्टमी का साजरी केली जाते?--

श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमीच्या दिवशी मध्यरात्रीच्या वेळेस मथुरा नगरीत कंसाच्या कारागृहात देवकीच्या गर्भातुन श्रीकृष्णाचा जन्म झाला होता.

असे म्हटले जाते की, द्वापर युगात पृथ्वीवर जेव्हा राक्षसांचे अन्याय अत्याचार हे वाढत होते, तेव्हा पृथ्वी मातेने गाईचे रूप धारण करून ती ब्रम्हा अणि विष्णु या दोघांकडे भेटीस जाते.

अणि पृथ्वी माता ब्रम्हा अणि विष्णु या दोघांना पृथ्वीवर राक्षसांकडून मानव जातीवर होत असलेल्या सर्व अन्याय अत्याचारा बद्दल सांगते.

तेव्हा ब्रम्हदेव हे विष्णुंना म्हणतात हे प्रभु पृथ्वीचे रक्षण करायला आपला आठवा अवतार धारण करायची वेळ आता आली आहे.

तेव्हा विष्णु म्हणतात, ठिक आहे. पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी अणि राक्षसांपासुन तिचे रक्षण करायला, पापींचा, अत्याचारींचा संहार करण्यासाठी मी मानव रूपात नक्की जन्म घेईल.

हिंदु मान्यतेनुसार देखील भगवान विष्णुच्या दहा अवताराविषयी सांगितले गेले आहे. जेव्हा जेव्हा ह्या सृष्टीवर पाप वाढेल, अन्याय, अत्याचार वाढेल तेव्हा राक्षसांचा संहार करण्यासाठी ते जन्म घेतील.

श्रीकृष्ण देखील भगवान विष्णु यांच्या दहा अवतारांपैकी एक आहे.

भगवान विष्णुंच्या ह्या कृष्ण अवताराची निर्मिती कंस नावाच्या नराधम, पापी अत्याचारी राक्षसाचा अंत करणे यासाठी झाली होती.

म्हणजेच कंस नावाच्या पापीचा अंत करणे, अत्याचारी, दुराचारी नराधम राक्षसाचा वध करण्यासाठी पृथ्वीला कंस नावाच्या राक्षसापासुन मुक्त करण्यासाठी श्रीकृष्णाने पृथ्वीवर एका बालकाच्या रूपात जन्म घेतला होता.

म्हणून कृष्णाच्या जन्मनिमित्त हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

             गोकुळाष्टमी कशी साजरी केली जाते?--

     श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला मथुरा नगरीमध्ये कंसाच्या कारागृहात देवकीने ज्या आठव्या अपत्याला जन्म दिला ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण होय. त्यांच्या जन्माचा दिवस हा जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी म्हणून साजरा केला जातो. परदेशात राहणारे भारतीय लोक सुद्धा ही गोकुळाष्टमी धुमधडाक्यात साजरी करतात.

     या दिवशी भक्त गोकुळाष्टमीचा उपवास करतात. या दिवशी त्या त्या ठिकाणच्या मंदिरांना संपूर्ण फुलांनी दिव्यांनी सजवले जाते. तसेच गोपाळाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून झोका दिला जातो. यानंतर भजन, कीर्तन केले जातात. त्यानंतर नाच गाण्यांचा कार्यक्रम देखील केला जातो. गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी तरुणांमध्ये दहीहंडी फोडण्याची स्पर्धा सुरू असते. संपूर्ण भारतभरातून भक्त दर्शनासाठी येत असतात.

     भगवान श्रीकृष्णाचे दही हे आवडते होते. तो आपल्या मित्रांसोबत लोणी, दही, दूध चोरून खाण्याचा प्रयत्न करीत असे. म्हणून त्याच्या या आठवणींना दहीहंडी महोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या प्रसादाला काला असे म्हणतात. दही काल्याच्या दिवशी भगवान कृष्णाला नैवेद्य दाखवून उपवास सोडून सोडला जातो. नैवेद्याचा काला सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटप करून त्यानंतर भगवान कृष्णाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.

        गोकुळाष्टमी कधी आहे आणि मुहूर्त?(Krishna Janmashtami 2023)--

श्रावण कृष्ण अष्टमी म्हणजेच ६ सप्टेंबर २०२३ या दिवशी गोकुळाष्टमी आहे.
अष्टमी तिथी सुरू – दुपारी ०३ वाजून ३७ मिनिटांनी
अष्टमी तिथी समाप्त – ७ सप्टेंबर २०२३ संध्याकाळी ०४ वाजून १४ मिनिटांनी.
रात्री पूजेचा मुहूर्त – १२ वाजून ०२ मिनिटे ते १२.४८ मिनिटांपर्यंत

--by Team MarathiZatka
----------------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीझटका.कॉम)
                    -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================