श्रीकृष्ण जयंती-लेख-6

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 05:18:13 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "श्रीकृष्ण जयंती"
                                     ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया एक महत्त्वाचा लेख.

                पूजा विधि(Gokulashtami 2023 Information)--

           पूजा साहित्य--

     श्रीकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा, गणेशपूजन, जानवे, गणेशाला अर्पण करण्याचे वस्त्र, विड्याची पाने, केळीची पाने, फुलदाणी, पांढरे वस्त्र, लाल वस्त्र, पंचरत्न दिवा, मोठ्या दिव्यासाठी तेल, समई, नारळ, तांदूळ, निरांजन, गुलाब आणि लाल कमळाची फुले, तुळशी, दुर्वा, अर्घ्य पात्र, कापूर, केशर, चंदन, ताम्हण, पळी, पंचपात्र, सुपारी, पुष्पहार, तुळशीच्या माळा, अगरबत्ती, कुंकू, धूप, अक्षता, अबीर, गुलाल, हळद, दागिने, सुटे पैसे, धागा, कापूस, दुर्वा, सुका मेवा, गंगेचे पाणी, मध, साखर, शुद्ध तूप, दही, लाह्या, दूध, हंगामी फळे, नैवेद्य किंवा मिठाई, अत्तर, सिंहासन, झुला, पंचामृत, इत्यांदी वस्तूंचा पूजेत समावेश करावा.

           गोकुळाष्टमी पूजा विधी –

या दिवशी सर्वप्रथम संपूर्ण घर झाडून पुसून स्वच्छ करणे. त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून, स्वच्छ कपडे घालणे.
पूजा साहित्य एकत्र करणे. फुले काढून आणणे. त्यानंतर वस्त्र वाती तयार करणे.

गणेश पूजन म्हणजेच एका ताटामध्ये तांदूळ आणि नारळ काढून ठेवणे.

नैवेद्यामध्ये कृष्णाला आवडतात ते पदार्थ म्हणजे शेवग्याच्या पाल्याची भाजी, आंबोळी, गुळचून आणि कुळीथाची उसळ तयार करून ठेवणे.

सर्वप्रथम घरातील देवाची पूजा करून घेणे.

नंतर एका पाटावर कृष्णाच्या मूर्तीची स्थापना करणे. पाटाच्या बाजूला रांगोळी काढणे.

त्यानंतर समई पेटवून घेणे.

प्रथम गणेश पूजन करून घेणे.

नंतर कृष्णाला जानवे घालून हळद, कुंकू, चंदन, अबिर लावून घेणे.

त्यानंतर कृष्णाला फुले अर्पण करणे.

अगरबत्ती आणि निरांजनाने ओवाळणे.

त्यानंतर धुपारती करणे.

मंत्रोच्चार करून ध्यानधारणा करणे. कृष्णाची प्रार्थना करणे.

त्यानंतर लाह्या आणि दूध तसेच पंचामृताचा नैवेद्य दाखवणे.

त्यानंतर कृष्णाची आरती करणे.

आरती केल्यानंतर लगेचच कृष्णाला नैवेद्य दाखवून तो नैवेद्य प्रसाद म्हणून घरातील सगळ्यांना वाटणे.

रात्री भजन, कीर्तनाचा, नाच गाण्यांचा कार्यक्रम करून रात्र जागवणे.

              गोपाळकाला पूजा विधि –

जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोपाळकाला या दिवशी संपूर्ण घराची स्वच्छता करून, स्वच्छ आंघोळ करून, स्वच्छ कपडे परिधान करणे.

त्यानंतर पूजेची सर्व तयारी करून घेणे.

नैवेद्याची पंचपक्वान्ने तयार करणे.

यानंतर सर्वप्रथम भगवान कृष्णाची यथासांग पूजा अर्चा आणि मंत्रोच्चार करून ध्यानधारणा करणे.

आरती झाल्यानंतर लगेचच नैवेद्य दाखवून घेणे.

--by Team MarathiZatka
----------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीझटका.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================