श्रीकृष्ण जयंती-लेख-9

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 05:22:10 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      "श्रीकृष्ण जयंती"
                                     ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया एक महत्त्वाचा लेख.

             गोकुळाष्टमी कथा--

     भोजवंशी राजा उग्रसेन हा मथुरेचा राजा होता. त्याच्या मुलाचे नाव कंस असे होते. जनतेवर तेथील लोकांवर खूप अन्याय अत्याचार करीत होता. त्याच्या या क्रूर स्वभावामुळे आणि त्याच्या या अत्याचाराला गावातील सगळी जनता कंटाळून गेली होती. याच त्याच्या स्वभावामुळे त्यांनी स्वतःच्या वडिलांना उग्रसेन राजांना सुद्धा बंदी बनवून कारागृहात डांबून ठेवले होते.

     ज्यावेळी महाराज उग्रसेन यांना कारागृहात डांबून ठेवले गेले त्यावेळी उग्रसेन यांनी कंसाला शाप दिला की एक दिवस तुझ्या पापाचा घडा नक्की भरेल. तसेच तू माझा मुलगा आहेस याची अत्यंत लाज वाटते असे देखील ते म्हणाले.

     त्याचवेळी उग्रसेन यांच्या देवक नावाच्या भावाच्या मुलीचे म्हणजेच देवकीच्या विवाहाची तयारी चालू असते. तिचे लग्न वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदार सोबत मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ज्यावेळी तिची पाठवणी केली जाते, त्यावेळी आकाशवाणी होते आणि ती कंसाच्या कानावर पडते. हे कंसा, ज्या देवकीला तू एवढ्या प्रेमाने, आदराने तिच्या सासरी सोडण्यासाठी घेऊन जात आहे, त्या देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला आठवा मुलगाच तुझा वध करणार आहे.

     ही आकाशवाणी ऐकून कंस खूप विचलित होऊन जातो आणि त्याचवेळी ठरवतो की मी जर वसुदेवाची हत्या केली तर देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्रापासून येणारे मृत्यूचे कुठलेच भय राहणार नाही. ज्यावेळी कंस वसुदेवाला मारायला जातो, त्यावेळी देवकी त्याच्या विनवण्या करते आणि त्याला वचन देते. माझ्या गर्भातून जेव्हा मूल जन्माला येईल ते मी तुझ्या स्वाधीन करीन. या वचनामुळे देवकी आणि वसुदेव या दोघांना देखील कंसाने मथुरेच्या महालामध्ये कारागृहात बंदी करून ठेवले.

     कंस हा सतत वसुदेव आणि देवकी यांचा छळ करायचा त्यांच्यावर अत्याचार करायचा देवकी ज्या पुत्राला जन्म द्यायची त्याला कंस तिच्याकडून घेऊन तिच्या डोळ्यासमोर तिच्या बाळाला मारून टाकत होता. असे एक एक करून, एकूण सात पुत्रांना या दुराचारी कंसाने तिच्या डोळ्यासमोर मारून टाकले होते.

     कालांतराने देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माची वेळ येते, म्हणून या कारागृहात देवकी आणि वसुदेव यांच्यावर कडक पहारा ठेवला जातो. देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माच्या वेळी वसुदेवाचा मित्र असलेला नंद गावातील राजा नंद याची पत्नी यशोदा देखील गर्भवती असते. राजा नंद देखील देवकीच्या या आठव्या पुत्राला कंसाच्या तावडीतून कसे वाचवायचे हाच विचार करीत असतो. अशा प्रकारे भाद्रपद कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म होतो. याचवेळी देवकी आणि वसुदेव राहत असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होतो आणि कारागृहाचे दरवाजे उघडले जातात. याच वेळी वसुदेव त्या आपल्या पुत्राला घेऊन राजा नंद यांच्याकडे जातात.

     आपला पुत्र त्यांना देऊन त्यांना झालेली कन्या घेऊन तो पुन्हा कारागृहात येतो. कारागृहात आल्यावर कारागृहातील दरवाजे पुन्हा आपोआप बंद होतात. त्यानंतर बाळाच्या रडण्याचा आवाज येताच पहारेकरी कंसाला जाऊन सांगतात. कंस लगेचच त्या ठिकाणी येतो आणि देवकीच्या हातातील त्या मुलीला हिसकावून घेतो आणि जमिनीवर फेकू लागतो. तेवढ्यात ती कन्या कंसाच्या हातून सुटून वर आकाशात जाते आणि त्याचवेळी पुन्हा आकाशवाणी होते की, कंसा तुला मारणारा या पृथ्वीवर जन्माला आलेला आहे. आणि तो गोकुळात नांदतो आहे. पुढे कृष्ण मोठा झाल्यावर मथुरेत येऊन तो कंसाचा वध करून राजा उग्रसेन, वासुदेव आणि देवकी यांची कारागृहातून सुटका करतो.

          श्री कृष्ण जन्माष्टमी 2023 प्रश्न –

--यावर्षी गोकुळाष्टमी किती तारखेला आहे?
--यावर्षी गोकुळाष्टमी ६ सप्टेंबर २०२३ या दिवशी आहे.

--गोकुळाष्टमीला कोणाची पूजा केली जाते?
--गोकुळाष्टमीला भगवान कृष्णाची पूजा केली जाते.

--श्रीकृष्णाचा जन्म कोणत्या वेळी झाला होता?
--श्रीकृष्णाचा जन्म हा मध्यरात्री झाला होता त्यामुळे हा सण संध्याकाळी साजरा केला जातो.

--जन्माष्टमी का साजरी केली जाते?
--वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून जन्माष्टमी साजरी केली जाते.

--जन्माष्टमी कशी साजरी केली जाते?
--भगवान कृष्णाची पूजा आमच्याकडून त्याचप्रमाणे आरती भजन कीर्तन करून तसेच दहीहंडी खेळून जन्माष्टमी साजरी केली जाते.

--जन्माष्टमी म्हणजे काय?
--श्रावण कृष्ण अष्टमीला भगवान कृष्णाचा जन्म झाला होता हा आनंद साजरा करण्यासाठी ही जन्माष्टमी म्हणजेच कृष्णाच्या जन्माची अष्टमी म्हणून साजरी केली जाते.

--by Team MarathiZatka
---------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीझटका.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================