श्रीकृष्ण जयंती-माहिती-2

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 05:24:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "श्रीकृष्ण जयंती"
                                     ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गोकुळाष्टमी विषयी संपूर्ण माहिती.

              गोकुळाष्टमी साजरी कशी करतात:--

     भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री मथुरा नगरीमध्ये श्रीकृष्ण भगवान यांनी पृथ्वीवर जन्म घेतला. त्या वेळेस मधुरेमध्ये जन्म झाला होता. त्यावेळेसचे मथुरे मधील राजा अत्याचारी कंस याला प्रजा कंटाळली होती. तो प्रजेवर असह्य यातना आणि जुलूम करत होता. त्यामुळे तेथील प्रजा खूपच दुखी व कष्टी होती. या लोकांचे अत्याचारी कंस राजापासून मुक्ती देण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला. गोकुळाष्टमी या निमित्त होणारी हालचाल संपूर्ण भारतामध्ये बघितली जाते. त्याचबरोबर परदेशी राहणाऱ्या भारतीय लोकांमध्ये सुद्धा गोकुळाष्टमी खूप धुमधडाक्यात मध्ये साजरी केली जाते.

     भक्त गोकुळाष्टमीच्या उत्सवावर उपवास ठेवली जातात, मंदिरांना सजवले जाते तसेच गोपाळाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून झोका दिला जातो. भजन-कीर्तन केली जाते आणि त्यासोबतच तरुणांमध्ये दहीहंडी फोडण्याची स्पर्धा केली जाते. त्याच्यासोबत श्रीकृष्णाची नगरी मथुरा मध्ये सुद्धा दुरून भक्त दर्शनासाठी येत असतात. त्या दिवशी संपूर्ण मथुरा नगरी भगवान श्रीकृष्णाच्या नावाने दुमदुमून जाते. श्रीकृष्ण त्यांच्या लहानपणी लोणी, दही, दूध आपल्या मित्रांसोबत एकत्र येऊन चोरून खाण्याचा प्रयत्न करीत असत. दही हे त्यांचे आवडते खाद्य होते. म्हणून दहीहंडी महोत्सव त्यांच्या आठवणी निमित्त साजरा केला जातो.

     उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपाळकाला असे म्हणतात. कृष्णजयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत कोकणात या सणानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला केला जातो. त्याचे जेवण करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे गोविंदा आला, गोकुळात आनंद झाला. असे गाणे म्हणत लहान-मोठे पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात.

     कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून श्रीकृष्ण चरित्रातील सोंगे करण्याचीही प्रथा आहे. या दिवशी महाराष्ट्रात मुंबई येथे उच्च मडक्यात दही, दूध यांनी भरलेला हंडा ठेवून तिथपर्यंत मानवी मनोरेची स्थापना करून दहीहंडा फोडण्याचा साहसी खेळ होतो. महाराष्ट्रातील एक वैष्णव वृत्त आहे. श्रीकृष्ण त्याच्या मित्रांसोबत गाई चारण्यासाठी जात असत व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्या खाद्यपदार्थाचा काला केला व सर्वात सत्याचे रक्षण केले, अशी एक कथा आहे. म्हणून या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे.

              गोकुळाष्टमीची पौराणिक कथा:--

     श्रीकृष्णाने पृथ्वीवर देवकी आणि वासुदेव यांच्या पोटी जन्म घेतला. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळेस अवकाश वाणी झाली होती, की देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करेल. कंसाच्या अत्याचारांनी संपूर्ण मथुरा नगरी त्रस्त झालेली होती. त्याच्या राज्यात राज्यांमध्ये निर्दोष लोकांना सुद्धा शिक्षा केली जाई. आपल्या मृत्यूच्या भीतीने त्याने एवढेच नव्हे तर आपली बहिण देवकी आणि तिचा पती वासुदेव ह्यांना सुद्धा काळकोठळीमध्ये टाकले होते. एवढेच नव्हे तर कंसाने आपल्या अत्याचाराने देवकीचे सहा पुत्रही आधीच मारून टाकले होते.

     भगवान श्रीकृष्णांच्या जन्म दिवशी आकाशा मधून घनघोर पावसाचे वर्ष सुरू होण्यास सुरुवात झाली. भगवान श्रीकृष्णाला सुरक्षित स्थानावर घेऊन जाण्यासाठी वासुदेव यांनी त्याला एका टोपलीमध्ये टाकले. यमुना नदी पार करत त्यांनी भगवान श्रीकृष्णाला आपल्या मित्र नंद गोपाल कडे नेले आणि त्यांनी आपल्या पुत्राला, भगवान कृष्णाला यशोदा माते पाशी झोपून ठेवून त्यांची कन्या घेऊन परत आले. अशा प्रकारे देवकी पुत्र भगवान कृष्णाचे पालन-पोषण यशोदा मातेने केले मात्र भगवान श्रीकृष्णाच्या दोन माता आहेत. एक जन्मदाती आणि एक पालन कर्ती. एक म्हणजे देवकी माता आणि दुसरी म्हणजे यशोदा माता.

     अशाप्रकारे गोकुळाष्टमी भारतातील विविध राज्यात मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी केली जाते.

--प्रमोद तपासे
-------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमोल.कॉम)
                       -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================