श्रीकृष्ण जयंती-निबंध-5

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 05:26:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "श्रीकृष्ण जयंती"
                                      ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया श्री कृष्ण जन्माष्टमी निबंध.

     नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो दर वर्षी प्रमाणे याही वर्षी आपण श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहोत.या वर्षी श्री कृष्ण जन्माष्टमी 06 तारखेला साजरी करणार आहोत.तर त्या विषयी आपण पूर्ण माहिती, श्री कृष्ण जन्माष्टमी निबंध, गवळणी आणि जन्माष्टमी चा पाळणा खालील प्रमाणे बघणार आहोत.

              श्री कृष्ण जन्माष्टमी निबंध--

"गोकुळामध्ये होता ज्याचा वास,
सुदामा ज्याचा मित्र होता खास,
गोपिकांसोबत ज्याने रसला रास,
त्याचा जन्म दिवस आहे आज"

      श्री कृष्ण जन्माष्टमी हा हिंदू समूहाद्वारे साजरा केला जाणारा उत्सव आहे.या दिवशी सर्वांच्या लाडक्या श्रीकृष्णाची आणि कृष्णाची प्रियशी राधा यांच्या प्रेमाचा आनंद दर्शवणारा दिवस म्हणून मोठ्या प्रमाणात उत्साहात सर्व भारतभर साजरा केला जातो. कृष्ण जन्माष्टमीला कृष्णशतामी, श्रीकृष्ण जयंती, श्रीजयंती इ. अनेक नावाने ओळखले जाते. भगवान श्रीकृष्णाचा वाढदिवस म्हणून जन्माष्टमी साजरी केली जाते. हा उत्सव केवळ भारतातच नाही तर प्रदेशात राहणारे भारतीय सुद्धा मोठ्या विश्वासाने आणि भक्तिभावाने साजरे करतात.

     श्रीकृष्णाचा जन्म १२ वाजता त्याचा मामा कंसाच्या तुरुंगात झाला. त्याच्या वडिलांचे नाव वासुदेव आणि आईचे नाव देवकी आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी लोक उपवास ठेवतात आणि मध्यरात्री बारा वाजता कृष्णाच्या जन्मानंतर श्रीकृष्णाची आरती केली जाते या नंतर लोक त्यांच्या नातेवाईका आणि शेजाऱ्यांसोबत उपवास सोडतात.

     ज्या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला आहे, त्या दिवशी मंदिरे खास सजावट केलेली केलेली असतात. जन्माच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास ठेवतात. या दिवशी मंदिरात भजन-कीर्तने गायली जातात आणि श्रीकृष्णाला पाळण्यात बसवून पाळणा म्हणतात. या दिवशी रामलिला देखील आयोजित केली जाते.

     श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढल्या जातात.मंदिरात एक पाळणा बांधला जातो. त्या पाळण्यात कृष्णाला ठेवतात व इतर खेळणी कृष्णाभोवती ठेवली जातात.उत्तर प्रदेशातील मथुरा- वृंदावन येथे कृष्ण वाढलेल्या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या प्रदेशातील कृष्ण मंदिरे सर्व सुंदर दिवे आणि फुलांच्या सजावटीने उधळली जातात. मथुरा वृंदावन मधील सर्व कृष्ण मंदिरे पाहण्यासाठी देशातील तसेच जगाच्या कानाकोपऱ्यातून भक्त आणि पर्यटक तिथे खूप गर्दी करतात. या दिवशी गुजरातमधील द्वारका येथे एक वेगळा उत्सव साजरा केला जातो. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील शेतकरी बैलगाड्या सजवतात आणि बैलगाड्यांवर कृष्णाची मूर्ती ठेवून नाचत नाचत मिरवणुका काढल्या जातात. कृष्ण जन्माष्टमी हा महाभारतात कंसाचा मारेकरी आणि अर्जुनाचा सल्लागार भगवान विष्णूच्या आठव्या पुनर्जन्मच्या जन्माचा उत्सव आहे. कृष्ण जन्माष्टमी विशेषतः काळया पंधरवड्या च्या म्हणजेच कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी श्रावणातील हिंदू लूनी-सौर दिनदर्शिकेत साजरी केली जाते.

     कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याचा भारतातील प्रत्येक राज्याचा स्वतःचा वेगळा मार्ग आहे. महाराष्ट्रामध्ये हा गोकुळाष्टमी म्हणून प्रसिद्ध आहे. देवळांची सजावट आणि इतर नेहमीच्या उत्सवाव्यतिरिक्त दहीहंडीचा विधी महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत सर्वत्र प्रसिद्ध आहे. मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मस्थळाच्या सभोवताली दोन किलोमीटरच्या परिघावर पसरलेल्या रस्त्यांना सुमारे ५००० एलईडी दिवे प्रकाशित केले जातात. श्रीकृष्ण मंदिर सजवण्यासाठी तीन-चार दिवस आधी सुरुवात केली जाते. या दिवशी मंदिराचे सौंदर्य एकदम खुलून उठते. मंदिरे रंगीत बल्बने सजवली जातात. जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्णजन्माचा दिवस कृष्ण जन्माष्टमी हा आनंद, मस्ती, भक्ती, प्रेम आणि करुणा या भावनांचे मिश्रण असलेला उत्सव आहे.

"राधेची भक्ती, बासरीची गोडी,
यशोदा- देवकी मैयामौरी,
श्रीकृष्ण-सुदामाची मैत्री न्यारी,
लोण्याचा स्वाद, सोबतीला गोपिकांचा रास,
मिळून साजरा करू श्रीकृष्णजन्माष्टमीचा दिवस आज "

--श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीदुनिया.कॉम)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================