श्रीकृष्ण जयंती-निबंध-6

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 05:32:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      "श्रीकृष्ण जयंती"
                                     ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया कृष्ण जन्माष्टमी निबंध.

     नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण कृष्णा जन्माष्टमी मराठी निबंध म्हणजेच krishna janmashtami essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . krishna janmashtami in marathi म्हणजेच gokulashtami information in marathi हा निबंध 100 , 200 आणि 3०० शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ....

     देशभरात कृष्ण जन्माष्टमी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . माता देवकी व पिता वसुदेव ह्याच्या पोटी श्री कृष्णाचा जन्म झाला होता . श्री कृष्णाला विष्णूचा अवतार समजतात . कारण विष्णु देवाने कंस मामाचा वध करण्यासाठी कृष्णाच्या रूपात आठवा अवतार घेतला होता .आणि कृष्ण हे भारतीयांचे आवडते दैवत आहे .

     मथुरा, गोवर्धन ,वृंदावन बाजाराच्या ठिकाणी जन्माष्टमीचा उत्सव आनंदाचा जल्लोष पहावयास मिळतो . सर्वच लोक हा दिवस महत्त्वाचा मानतात . कृष्ण मंदिराबरोबरच भगवान विष्णूंच्या मंदिरात हा उत्सव साजरा केला जातो. कृष्ण जन्माष्टमी नंतर दुसऱ्या दिवशी गोकुळाष्टमी साजरी केली जाते . ह्या दिवशी जागो जागी दहीहंडी चे आयोजन केले जाते .

                कृष्ण जन्माष्टमी निबंध 2023--

     श्रीकृष्ण जन्माष्टमी हा हिंदूचा महत्त्वाचा सण आहे. श्रीकृष्ण जन्माचे स्मरण ठेवण्यासाठी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते . भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरा नगरीमध्ये माता देवकी व पिता वसुदेव यांच्या पोटी झाला होता . ते भगवान विष्णूचा आठवा अवतार होते असेही मानले जाते . दृष्ट कंस मामाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूचे अवतार घेतल्याने यास कृष्णावतार असे म्हटले जाते .

     भगवान श्रीकृष्णाचे बालपण गोकुळात गेले . माता यशोदा व पिता नंद हे त्यांचे पालन करते होते . गोकुळात श्रीकृष्णांनी लहान वयात खूप कृष्ण लीला दाखविल्या होत्या . गोकुळामध्ये त्यावेळी श्रीकृष्ण हे गोपिकांचे लाडके बनले होते . श्रीकृष्णाचा जन्म अत्यंत वाईट परिस्थितीत होऊनही त्यांनी दिव्य कार्य केले. श्रीकृष्ण जन्माष्टमी ला हिंदू लोक खूप महत्त्व देतात . या दिवशी लोक रात्रभर जागरण करतात ,श्रीकृष्णाचे भजन, कीर्तन ,आरती इत्यादी. करतात. दिवसभर उपवास करतात . श्री कृष्णाची मंदिरे या दिवशी आकर्षक फुलांनी ,दिव्यांनी सजवली जातात .

     श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला जातो . अनेक लोक मोठ्या आनंदाने यामध्ये सहभागी होतात . लोक वाईट शक्तींपासून तारणारा देव म्हणून कृष्णास मानता. कृष्णजन्माष्टमी हा प्रमुख हिंदू सण आता केवळ भारत देशातच नाही तर नेपाळ ,बांगलादेश इत्यादी. देशात ही कृष्ण भक्तांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा श्रीकृष्णाच्या आठवण होते . दुर्जनांचा नाश सज्जनांचे रक्षण व मानव धर्माची स्थापना करणाऱ्या भगवंताला लोक मनोभावाने पुजतात .

--by Pritam Sansare
-----------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ज्ञान जेनीक्स.कॉम)
                       ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================