श्रीकृष्ण जयंती-श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा-3

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 06:16:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "श्रीकृष्ण जयंती"
                                     ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा.

     आज श्रीकृष्ण जन्माष्टमी सर्व श्रीकृष्णाच्या भक्तांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश देण्यासाठी आम्ही काही निवडक अश्या शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत ,त्या आपण आपल्या परिजनांना शुभेच्छा देऊ शकता तसेश श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या स्टेटस व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वर ठेवू शकता.

     हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी. श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्याच्या श्री कृष्ण पक्ष अष्टमीला झाला होता त्यामुळेच या दिवशी श्रीकृष्ण जयंती किंवा जन्माष्टमी असेही म्हटले जाते . विविध भागात या सणाला विविध असे नाव हवे आहेत नावे आहेत कृष्णाष्टमी गोकुळाष्टमी अष्टमी रोहिनी श्रीकृष्णजयंती असेदेखील या सणाला नावे आहेत .

     जेव्हा जेव्हा पृथ्वीतलावर धर्माचा नाश होत असेल, पाप अत्याचार वाढत असेल तेव्हा तेव्हा श्रीकृष्णाने पृथ्वीतलावर जन्म घेतला आहे. श्रीकृष्णाचा आठवा अवतार या दिवशी झाला म्हणूनच याला जन्माष्टमी किंवा कृष्णाष्टमी असे म्हटले जाते. कृष्ण जन्माष्टमी च्या आदल्या दिवशी रात्रभर श्रीकृष्णाचे कीर्तन पूजन भजन केले जाते ठीक बारा वाजता श्रीकृष्णाचा पाळणा गाऊन श्रीकृष्ण जयंती ची श्रीकृष्णाची आरती म्हटली जाते व त्याची पूजा केली जाते

           श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा--

=========================================
--पहा पुन्हा जन्माष्टमी आली, लोण्याच्या भांडयाने पुन्हा एक गोडवा घेऊन आली. कान्हाची आहे किमया न्यारी. दे सर्वाना आशीर्वाद भारी"
गोकुळाष्टमी निमित्त आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा.!


--भगवान श्रीकृष्णाने धर्माचे रक्षण करण्याकरिता ज्या दिवशी पृथ्वीवर जन्म घेतला तो दिवस म्हणजे गोकुळ अष्टमी होय. श्री भगवान कृष्ण यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या कुटुंबावर असो.!!
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा....!!!!


--राधेची भक्ती, बासरीची गोडी, लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास..मिळून साजरा करू, श्री कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आज खास...


--कृष्ण ज्याचं नाव गोकुळ ज्याचं धाम अशा श्री भगवान कृष्णाना आमचा शतशः प्रणाम.
श्री कृष्ण जन्माष्टमीच्या  सर्वांना शुभेच्छा!


--हे आनंद उमंग झाला जय हो नंदलाल ची गोकुळात आनंद झाला जय कन्हैयालाल ची
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


--सवंगड्यासोबत करतो दंगा हातात घेऊनी बासरी कपाळावर आहे मोरपीस चोरून घेतो लोण्याचा गोळा फोडून दही हंडी करतो धमाल असा हा नटखट नंद किशोर


--गोकुळामध्ये होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रचला रास.. यशोदा, देवकी ज्याची मैय्या, तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या.


--कलेकलेने चंद्र वाढतो चिमणा नंदाघरी जगोद्धारा धरी यशोदा पाळण्याची दोरी जय श्री कृष्णा !
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


--चंदनाचा सुगंध, फुलांचा हार, पावसाचा सुगंध, राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाची आली बहार.. !!
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.!!


--ज्यांच्या मनात श्रीकृष्ण त्यांच्या भाग्यात वैकुंठ ज्यांनी स्वतःला भगवान कृष्णास अर्पित केले आहे त्यांचे नेहमीच कल्याण झाले आहे आपणास व आपल्या कुटुंबास
श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...!


--वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं । देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं ||
गोकुळाष्टमीच्या मन:पुर्वक शुभेच्छा
=========================================

--मराठी भाषण व सूत्रसंचालन
--------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीभाषण.कॉम)
                      ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================