श्रीकृष्ण जयंती-श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा-4

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 06:18:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "श्रीकृष्ण जयंती"
                                    ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा.

     'आज गोकुळात रंग खेळतो हरी... राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी'  भगवान श्रीकृष्णाचा जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस जन्माष्टमी म्हणून ओळखला जातो. यालाच गोपालकाला, दहीकाला, दहीहंडी असे देखील म्हटले जाते. पारंपरिक हिंदू धारणेनुसार श्रीकृष्ण हा हिंदूचा आठवा अवतार मानला जातो. श्रावण महिन्यातील सण यांचे हिंदू धर्मात फारच महत्व आहे श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्म झाला.  यंदा 30 ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी आली आहे.या दिवशी तुम्ही तुमच्या जवळ्च्या व्यक्तिंना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Janmashtami Wishes In Marathi), कृष्ण जन्माष्टमी कोट्स (Krishna Janmashtami Quotes In Marathi), दहीहंडी शुभेच्छा (Dahi Handi Wishes In Marathi), हॅपी जन्माष्टमी स्टेटस (Happy Janmashtami Status In Marathi), गोकुळाष्टमी मेसेज (Gokulashtami Messages In Marathi) गोकुळाष्टमी शुभेच्छा (Gokulashtami Wishes In Marathi) आणि जन्माष्टमी मराठी एसएमएस (Happy Janmashtami Marathi Sms) पाठवू शकता.

           Krishna Janmashtami Quotes--

     कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी खास कोट्स पाठवून तुम्ही आजचा दिवस भगवान श्रीकृष्णाचे विचार शेअर करु शकता.  या विचारांनी तुमचे आयुष्य बदलण्यास तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. जाणून घेऊया जन्माष्टमीच्या निमित्ताने हे खास कोट्स (Krishna Janmashtami Quotes).

=========================================
रुप मोठे प्रेमळ आहे, चेहरा त्याचा निराळा आहे,
सर्वात मोठ्या समस्येला, श्रीकृष्णाने सहज पार केले आहे

सकाम निष्मकाम भक्ती कामनेनं फळं घडे
नि: काम भजने भगवंत जोडे | फळ भगवंता  कोणीकडे.. (दासबोध)
अर्थ:  सकाम भक्ती केली तर  कामना  पूर्ण होईल.
वासुदेव: सर्वमति! ( सर्व जड आणि चेतन अशा सृष्टीत परमेश्वर आहे)

जेव्हा एखादा जास्त हसणारा आणि आनंदी राहणारा माणूस अचानक गप्प राहतो, त्यावेळी तो मनुष्य आतून तुटला आहे हे लक्षात घ्यावे

अन्यायाचा स्वीकार कधीही करु नका, भगवान कृष्ण हे शांतप्रिय होते, पण त्यांनी
अन्यायाचा  कधीही स्विकार केला नाही. अन्यायाविरुद्ध आवाज उठवला.
हाथी घोडा पालखी... जय कन्हैया लालकी, कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

दिन आला मोठा आज कृष्ण आमचा पृथ्वीतलावर आला, कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

कृष्णाची भक्ती कृष्णाची शक्ती अपरंपार... कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

कलेकलेने चंद्र वाढतो चिमणा नंदाघरी,
जगोद्धारा घरी यशोदा,पाळण्याची दोरी,कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

वसुदेवं सुतं देव, कंस चाणूर मर्दनम
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

उदारता हीच एखाद्या व्यक्तीला संपन्न करत असते
आयुष्यात यश्स्वी होण्यासाठी महिलांचा सन्मान करणे फारच गरजेचे असते
कजोर आणि कमकुवत व्यक्तीची करा मदत
मित्रता पाळा- श्रीकृष्ण

"यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।"
=========================================

--LEENAL GAWADE
----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================