श्रीकृष्ण जयंती-श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा-14

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 06:35:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "श्रीकृष्ण जयंती"
                                     ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा.

     Krishna Janmashtami Messages in Marathi 2023: जन्माष्टमी हि हिंदू धर्मातील देवता श्रीकृष्ण यांचा जन्मानिम्मित साजरा केला जाणारा सण आहे. कृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्माचा सण आहे जो दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये येतो. या सणाचा सर्वात भव्य उत्सव कृष्ण जन्मभूमि मथुरा येथे साजरा केला जातो. हा सण कृष्णाष्टमी, गोकुळाष्टमी, अष्टमी रोहिणी, श्री कृष्ण जयंती, श्री कृष्ण जयंती इत्यादी इतर बर्‍याच नावांनी देखील ओळखले जाते. या सणाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. हा उत्सव हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे. हिंदू धर्मातील अनेक अनुयायी या दिवशी उपवास करतात जेणेकरून त्यांना भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतील.

     आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी Janmashtami quotes in Marathi, Janmashtami wishes in Marathi, thoughts related to Janmashtami, Quotes on Janmashtami in Marathi, Janmashtami Messages in Marathi, happy Janmashtami status 2023 हे सगळे Messages मराठी मध्ये घेऊन आलो आहोत.

=========================================
कृष्ण ज्याचं नाव
गोकुळ ज्याचं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

गोकुळामध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
।।गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा।।

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट...
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी
आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर
व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
|| शुभ गोकुळाष्टमी ||
=========================================

--by Marathi Varsa Team
----------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवारसI.कॉम)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================